मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vikram gokhale: डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू पण...विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत सहकाऱ्याने दिली लेटेस्ट अपडेट

Vikram gokhale: डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू पण...विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत सहकाऱ्याने दिली लेटेस्ट अपडेट

विक्रम गोखले

विक्रम गोखले

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; गोखले यांचे जवळचे सहकारी राजेश दामले यांचा मोठा खुलासा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

पुणे 24 नोव्हेंबर : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या 15 दिवसापासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या निधनाचं वृत्त फेटाळलं आहे. आता त्यांच्या प्रकृतीबाबत गोखले यांचे जवळचे सहकारी राजेश दामले यांनी मोठा खुलासा केला आहे.

विक्रम गोखले यांची प्रकृती गेल्या 24 तासांपासून चिंताजनक आहे. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पण उपचारांना त्यांची तब्येत हवी तशी साथ देत नाही. खूप कॉम्पिलिकेशन्स आहे. डॉक्टरांनी फक्त आम्ही प्रयत्न करतोय एवढंच सांगितलं आहे. या शिवाय काहीही सांगितलं नाही. त्याचबरोबर डॉक्टरांनी माहिती दिली आहे कि, विक्रम गोखले क्रिटिकल आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत खूप कोंपलिकेशन आहेत. त्यांचं शरीर उपचारांना म्हणावं तसा प्रतिसाद देत नाहीय. त्याचबरोबर डॉक्टर यांनी आम्ही प्रयत्न करतो आहे असं सांगितले आहे

हेही वाचा - Vikram Gokhale : विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीशी जुनं नातं; वडिलच नाही तर आजी-आजोबाही हाडाचे कलाकार

राजेश दामले यांनी माहिती दिली आहे कि, जोपर्यंत डॉक्टर काही सांगतील नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफांववर विश्वास ठेऊ नका. डॉक्टरांचे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत कोणी ही अफवा पसरवू नका. तसेच त्यांची फॅमिली त्यांच्यासोबत आहेत.

तसेच काही काळापूर्वी विक्रम गोखले यांची पत्नी वृषाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विक्रम गोखलेंच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं. "ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती सुधारतीये की खराब होतीये आणि ते उपचारांना कशाप्रकारे प्रतिसाद देतात यावर डॉक्टर आज सकाळी काय करायचं ते ठरवतील", असं त्यांनी सांगितलं.

विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हटलं की, "ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अजूनही गंभीर आहेत आणि लाइफ सपोर्टवर आहेत, त्यांचे अद्याप निधन झाले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा." विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमुळे सिनेसृष्टीत चिंताजनक वातावरण आहे.

First published: