मुंबई, 26 नोव्हेंबर : ज्येष्ठ बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी नवनवीन अपडेट समोर येत आहे. काल विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारण होत असल्याची बातमी समोर आली होती. पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. विक्रम गोखले यांनी डोळे उघडले असून उद्या त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढलं जाऊ शकतं. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया ही स्थिर आहे, असं जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितलं होतं. अशातच त्यांच्या प्रकृतीविषयी नवी अपडेट समोर आली आहे.
मेडिकल बुलेटिन नुसार, विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावलीय, रक्तदाब नियमित करण्यासाठी औषधे चालू आहेत, ते अजूनही व्हेंटिलेटरवरच आहेत. त्यांचे चाहते, मित्र परिवार आणि कुटुंबिय चिंतेत आहेत. प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याच्या बातम्यांमध्येच पुन्हा त्यांची प्रकृती ढासळली आहे.
"Veteran Actor Vikram Gokhale is still critical and on life support, he has not passed away yet. Keep praying for him," confirms Vikram Gokhale's daughter
(File pic) pic.twitter.com/bs53dFIbxE — ANI (@ANI) November 23, 2022
गेल्या बऱ्याच दिवसांपासून विक्रम गोखले पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या निधनाचं वृत्त फेटाळलं आहे. त्यांचे चाहते सगळे त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, विक्रम गोखले यांचे जवळचे सहकारी राजेश दामले यांनीही नुकताच त्यांच्या प्रकृतीविषयी मोठा खुलासा केला. राजेश दामले यांनी माहिती दिली आहे कि, जोपर्यंत डॉक्टर काही सांगतील नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफांववर विश्वास ठेऊ नका. डॉक्टरांचे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत कोणी ही अफवा पसरवू नका. तसेच त्यांची फॅमिली त्यांच्यासोबत आहेत.
विक्रम गोखले यांनी 'अग्निपथ', 'हम दिल दे चुके सनम', 'भूल भुलैया', 'गोदावरी', 'नटसम्राट' आणि 'मिशन मंगल'सह अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Health