'पत्नीला धोका दिल्याचा पश्चाताप..', सुष्मिता सेनबरोबरच्या अफेअरबद्दल विक्रम भट्ट यांनी व्यक्त केलं दु:ख

'पत्नीला धोका दिल्याचा पश्चाताप..', सुष्मिता सेनबरोबरच्या अफेअरबद्दल विक्रम भट्ट यांनी व्यक्त केलं दु:ख

दिग्दर्शक विक्रम भट्ट (Vikram Bhatt) आणि अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती आणि नंतर विक्रम भट्ट यांनी या प्रेमप्रकरणाबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला होता.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल: बॉलिवूडमधल्या (Bollywood) प्रेमप्रकरणांचे, विवाहबाह्य संबंधांचे (Extramarital Affairs) किस्से अनेकदा चर्चेत आले आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचे सिनेमे तर पाहायला आवडतात आणि त्यांच्या खासगी आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घेण्यातही रस असतो. असाच एक किस्सा म्हणजे दिग्दर्शक विक्रम भट्ट (Vikram Bhatt) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या प्रेमप्रकरणाचा. त्या वेळी त्यांच्या या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा होती आणि नंतर विक्रम भट्ट यांनी या प्रेमप्रकरणाबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला होता. नवभारत टाइम्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सुष्मिता सेन एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 1996मध्ये सुष्मिता 20-21 वर्षांची, तर विक्रम भट्ट साधारण 27 वर्षांचे होते. त्या वेळी महेश भट्ट दिग्दर्शित करत असलेल्या 'दस्तक' (Dastak) या सिनेमाच्या सेटवरून या प्रेमप्रकरणाची गोष्ट सुरू झाली. सुष्मिता आणि विक्रम यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली तेव्हा तेव्हा विक्रम यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगीही होती. त्यांच्या या प्रेमप्रकरणाची झळ साहजिकच त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. तेव्हा सुष्मितासाठी विक्रम यांनी चक्क आपली पत्नी अदिती आणि मुलगी या दोघींना सोडून द्यायचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

(हे वाचा-'या' लोकांना मोफत कोरोना लस देणार; प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली लसीकरणाची जबाबदारी)

विक्रम यांनी नंतर याबद्दल खंत व्यक्त केली होती. 'एका इमॅच्यूर रिलेशनशिपसाठी मी पत्नी आणि मुलीला सोडून दिलं, याचा मला पश्चात्ताप होतो,' असं ते म्हणाले होते. सुष्मिता आणि आपल्यात जे काही झालं होतं, त्याला वय कारणीभूत होतं, असंही ते म्हणाले होते. माध्यमांशी बोलताना विक्रम म्हणाले होते, 'माझी पत्नी आणि मुलगी यांना मी सोडून दिलं, त्यांना दुःख दिलं याचं मला खूप दुःख झालं. मला त्याचा पश्चात्ताप होतो. मला असं वाटतं, की जेव्हा आपल्यात हिंमत नसते, तेव्हा आपण चलाखी करत जातो. मला नेमकं काय वाटत होतं, ते अदितीला सांगण्याची हिंमत मला होत नव्हती. हे सगळं एकदमच घडून आलं. त्या वेळी मी कमजोर पडलो, याचं मला खूप दुःख आहे. तेव्हा मी कमजोर पडलो नसतो, तर आज कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं.'

विक्रम यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता; मात्र त्यासाठी त्यांनी सुष्मिताला जबाबदार धरलं नव्हतं. आपण आयुष्यात ज्या काही चुका केल्या, त्या त्यासाठी कारणीभूत होत्या, असं त्यांनी सांगितलं होतं. 'मीच माझ्या आयुष्याचं मातेरं करून टाकलं होतं, हे त्यामागचं कारण होतं,' असं ते म्हणाले होते.

(हे वाचा-नववी नापास ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज; असा आहे गायक आनंद शिंदेंचा खडतर प्रवास)

'मी पत्नी अदितीला घटस्फोट दिला. 'गुलाम' हा माझा सिनेमा तेव्हा रिलीज होणार होता; पण मी तेव्हा केवळ सुष्मिताचा बॉयफ्रेंड (Boyfriend) बनून राहिलो होतो. मी खूप तणावात होतो. माझ्या मुलीला मी मिस करत होतो. सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. कोणत्या एका नात्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं मला वाटत नाही. या साऱ्याला मी स्वतःच जबाबदार होतो,' असं विक्रम यांनी सांगितलं होतं.

First published: April 22, 2021, 12:17 PM IST

ताज्या बातम्या