कॅमेरा तंत्र विकसित करून मराठमोळ्या भारतीयानं पटकावला ऑस्कर!

कॅमेरा तंत्र विकसित करून मराठमोळ्या भारतीयानं पटकावला ऑस्कर!

हा मान मिळवलाय मराठमोळा तरुण विकास साठ्येनं. शनिवारी रात्री सायन्टिफिक अॅण्ड इंजिनीयरिंग आॅस्कर पुरस्काराचं वितरण झालं.

  • Share this:

12 फेब्रुवारी : ... अँड आॅस्कर गोज टू. हे ऐकायला कलाकारांचे कान आसुसले असतात. आणि हा मान मिळवलाय मराठमोळा तरुण विकास साठ्येनं. शनिवारी रात्री सायन्टिफिक अॅण्ड इंजिनीयरिंग आॅस्कर पुरस्काराचं वितरण झालं. 'के1 शॉटओव्हर' या कॅमेऱ्याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचणारे साठ्ये यांना ९०व्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्डच्या सायंटिफिक अँड टेक्निकल पुरस्कारानं लॉस एंजेलिस येथे गौरविण्यात आलं आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या निवड समितीनं साठ्ये यांच्यासोबत या कॅमेऱ्यावर काम करणारे जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅम या तिघांचीही पुरस्कारासाठी निवड केली.

सिनेमॅटिक कॅमेऱ्याचे देशी तंत्र विकसित करणारे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या धडपडीवरील 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. याच्या कथानकाशी साजेशी धडपड करत विकास साठ्ये यांनी 'के1 शॉटओव्हर' कॅमेरा तंत्र विकसित करून जागतिक सिनेमाचे छायांकन सुस्पष्ट केले आहे.

विकास साठ्ये यांचा जन्म पुण्यातला, मुंबईत शिक्षण झालं. पुण्याच्या इंजिनियरिंग काॅलेजमध्ये शिकवत असताना, त्यांना इटलीला जाण्याची संधी मिळाली आणि मग तंत्रज्ञानाच्या अनेकविध संधी पुढे उभ्या राहिल्या. आज त्यांना मिळालेल्या आॅस्कर पुरस्कारानं भारतीयांची मान अभिमानानं उंचावलीय.

या सिनेमांमध्ये वापरले गेले 'के1 शॉटओव्हर' तंत्रज्ञान

वॉर फॉर द प्लॅनेट ऑफ द एप्स

द फेट ऑफ दि फ्युरियस

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन

डेड मेन टेल नो टेल्स

डंकर्क

स्पायडरमॅन

होमकमिंग

ट्रान्सफॉर्मर्स

द लास्ट नाइट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 11:26 AM IST

ताज्या बातम्या