मुंबई, 18 मे - आनंद दिघे यांचा जीवनपट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे
' (dharmaveer)या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केला आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'
(dharmaveer)या चित्रपटातील अभिनेता प्रसाद ओकच्या
(prasad oak) लुकपासून ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा सध्या सुरू आहे.या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही भूमिका प्रसाद ओकच्या अगोदर पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने करणार होते, अशी चर्चा होती. खरं तर या भूमिकेसाठी प्रवीण तरडे यांनी विजू माने यांनाच प्रथम प्राधान्य दिले होते. मात्र ही भूमिका करण्यास त्यांनी नकार दिला होता. यावरून विजू माने यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ‘प्रवीण विठ्ठल तरडे
( pravin-tarde), मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं. सध्या विजू माने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
दिग्दर्शक विजू माने यांची नेमकी काय आहे फेसबुक पोस्ट?
विजू माने यांनी प्रविण तरडे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, 'प्रवीण विठ्ठल तरडे...मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं...... मराठी चित्रपटसृष्टीतील एक माईलस्टोन ठरलेला 'धर्मवीर' चित्रपट. मी 'पांडू' सिनेमा चित्रित करत असताना माझ्या कानावर आलं की प्रवीण तरडे 'धर्मवीर' नावाचा चित्रपट करतोय. सिनेमाचं शूट संपल्यावर पांडूचं प्रमोशन सुरू झालं. आणि प्रवीण म्हणाला विजू धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका करशील का ? कारण तू त्यांना जवळून पाहिले आहेस. त्यांचा सहवास बराच तुला लाभला आहे. तुला त्यांची प्रत्येक वृत्ती, देहबोली, नजर, लकबी माहिती आहे. मी हसलो. मला वाटलं प्रवीण माझी मस्करी करतोय.प्रवीणला मी म्हणालो, तुला जी हवी ती मदत मी करेन त्यासाठी असं काही बोलायची गरज नाही. तो विषय टाळून आम्ही पुढे गेलो. पण प्रवीणने पुन्हा एकदा प्रमोशनच्या निमित्ताने भेटलो असता विषय काढला अरे विजू तुझी ऑडिशन कधी देतोयस? मी म्हटलं कसली ? तर म्हणाला ,धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या रोलची. अरे वेडा आहेस का ???? त्या व्यक्तीचं चरित्र साकारणं? तेवढा बरा अभिनेता मी नाही. आणि जे मला जमणार नाही ते मी कधीच करणार नाही. माझ्या नकाराबद्दल तुला जरी वाईट वाटलं तरी हा निर्णय मी ठाम पणे घेतलेला आहे. तुही असा विचार करू नकोस, खूप चांगले अभिनेते मराठी चित्रपट सृष्टीत आहेत. आणि त्याला प्रसाद ओक दिसला....इतिहास घडला.'
वाचा-
'....हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं पण खरं सांगू' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
'धर्मवीर' सिनेमा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी जर प्रवीण तरडेला होकार कळवला असता, तर त्या सिनेमाचं काय होऊ शकलं असतं. इतका अप्रतिम सिनेमा झालाय. प्रसादच्या अभिनयानं तो एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे 'धर्मवीर' या सिनेमापासून मराठी चित्रपटसृष्टीत *प्रसादपर्व* सुरू होणार आहे. प्रसाद माझा लाडका अभिनेता आहेच, चांगला मित्र आहे. शिवाय माझ्या 'ती रात्र', 'खेळ मांडला', 'शिकारी' अशा सिनेमांमध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे. मला नेहमी असं वाटायचं की मराठी चित्रपटसृष्टीत दोन अभिनेते असे आहेत ज्यांना त्यांच्या क्षमता सिद्ध करणारं काम मिळालेलं नाही. यातील एक अभिजीत चव्हाण आणि दुसरा म्हणजे प्रसाद. 'धर्मवीर' सिनेमा पाहताना अभिनयाने 'पडदा व्यापून टाकला' म्हणजे काय हे कळतं. प्रसाद प्रसाद आणि प्रसाद... मला तर अनेकदा शंका यायची प्रसादच्या अंगात प्रत्यक्ष दिघेसाहेब यायचे की काय.'
वाचा-
'इन दस सालों ने जो तजुर्बा ..' कुशल बद्रिकेला नेमकं सांगायचं तरी काय आहे ?
'मी एकदा सहज सेटवरही गेलो होतो. तिचे प्रसाद माझ्याशी गप्पा मारत होता. अचानक टेक सुरू झाला. प्रसादने डोळे बंद केले. आणि कॅमेरा साठी डोळे उघडले. ते मला प्रसादचे वाटलेच नाहीत. ते धर्मवीरांचे होते, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
विजू माने यांच्या पोस्टवर प्रसाद ओकनं देखील कमेंट केली आहे. त्याने म्हटलं आहे की,विजूssssssss मित्राsssssss तुझ्यासारख्या सच्च्या, मनमोकळेपणानी व्यक्त होणाऱ्या माणसांची समाजात ( म्हणजे आपल्या so called इंडस्ट्रीत ) नितांत गरज आहे यार. आणि याचं कारण आहे तुझी कामावरची "निष्ठा" आणि निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येकावरचं तुझं प्रेम... तू जे करतोस ते चांगलं वाईट, चाललं नाही चाललं, आवडलं नाही आवडलं यापलीकडे जाऊन निष्ठेने करतोस. कदाचित हाच दुवा असेल आपल्या निरपेक्ष मैत्रीचा... आणि हाच ठेवा असेल माझा... तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाचा...!!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.