नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा
(Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना
(Rashmika Mandanna) सतत चर्चेत असतात. दोघांनी आतापर्यंत 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटात सोबत काम केलेलं आहे. दोन्ही चित्रपटांमधील त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश असलेली रश्मिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट
(Date) करत असल्याची जोरदार चर्चा आहे. ते अनेकदा सोबत फिरताना दिसले आहेत. त्यामुळे चाहते त्यांना 'कपल'च समजत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघेही मुंबईमध्ये स्पॉट झाले होते. त्यानंतर दोघांचं रिलेशनशीप आणि लग्नाच्या
(Wedding) चर्चांना उधाण आलं आहे. या वर्षाच्या अखेरीस हे जोडपं विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, रश्मिका किंवा विजय या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही.
अभिनेता विजय देवरकोंडा सध्या पुरी जगन्नाथच्या 'लायगर'
(Liger) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगनिमित्त तो सध्या मुंबईमध्ये आहे. दरम्यान, रश्मिकानं नुकतंच मुंबईत एक अपार्टमेंट
(Apartment) विकत घेतलं असून ती आपल्या पेट डॉग ऑरासोबत
(Aura) त्याठिकाणी राहण्यासाठी गेली आहे. याशिवाय रश्मिका आणि विजय अनेकदा मुंबईत डेटवर जाताना दिसले आहेत. इतकंच नाही तर रश्मिकानं आपल्या नवीन वर्षाची
(New Year) सुरुवातदेखील विजयसोबतच केली. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी रश्मिका आणि विजय गोव्याला गेले होते. त्यांच्यासोबत विजयचा भाऊ आनंददेखील
(Anand Deverakonda) होता. विजयची आई माधवी यांचा आणि रश्मिकाचा बाँडसुद्धा चांगला असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, रश्मिका सध्या आपल्या पुष्पा: द राइज चित्रपटाच्या
(Pushpa: The Rise) प्रचंड यशानंतर प्रसिद्धीचा आनंद लुटत आहे. IndiaToday.in ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं प्रेम
(Love) आणि लग्नाबद्दल
(Marriage) खुलासा केला. 23 वर्षांच्या रश्मिकानं सांगितलं की, लग्नासारखी मोठी जबाबदारी घेण्यास ती अद्याप खूप लहान आहे. लग्नाबद्दल काय विचार करावा हे मला समजत नाही. मी याबद्दल विचारही केला नाही. मात्र, ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत मला सुरक्षित वाटलं पाहिजे. यालाच मी प्रेम समजते, असं रश्मिका म्हणाली.
रश्मिकाच्या मते, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना वेळ देणं आणि एकमेकांच्यासोबत सुरक्षित वाटणं म्हणजेच प्रेम आहे. प्रेम ही भावना आहे त्यामुळ ती शब्दात मांडणं कठीण आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात, तेव्हाच ते यशस्वी होतं, असंही रश्मिका म्हणाली होती.
रश्मिका आणि विजय देवरकोंडा खरच रिलेशनशीपमध्ये आहेत का? ते दोघे खरचं लग्न करणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.