मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO : विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचं झालं ब्रेकअप? नॅशनल क्रश 'या' अभिनेत्याच्या प्रेमात

VIDEO : विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचं झालं ब्रेकअप? नॅशनल क्रश 'या' अभिनेत्याच्या प्रेमात

 विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचं झालं ब्रेकअप?

विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचं झालं ब्रेकअप?

साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. डिअर कॉम्रेड व गीता गोविंदम चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे आणि या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल- साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या  होत्या. डिअर कॉम्रेड व गीता गोविंदम चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे आणि या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.   तेव्हापासून नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या डेटिंगच्या बातम्या नॉर्मल झाल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या रंगल्या आहेत.  या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतचं वक्तव्य केलेलं नाही. मात्र आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे, ज्यामुळे या जोडीचे चाहते निराश होऊ शकतात. नवीन रिपोर्टनुसार, रश्मिका विजय देवरकोंडाला नाही तर एक वेगळ्या अभिनेत्याला पसंत करत असल्याचे समोर आलं आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे की, हा अभिनेता नेमका आहे तरी कोण?

वाचा-हेमामालिनी जेव्हा पहिल्यांदा सासूला भेटल्या;धर्मेंद्रच्या आईने म्हटलेलं असं काही

ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाला नाही तर तेलुगु अभिनेता बेलामकोंडा साई श्रीनिवास यांना पसंत करत असल्याचे समोर आले आहे. एका पोर्टलच्या सूत्रांनुसार, रश्मिका आणि बेलमकोंडा साई श्रीनिवास यांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. ज्यामुळं दोघांच्यात जवळीकता वाढल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे वास्तवात रश्मिका आणि श्रीनिवास दोघं एकमेकांना पसंत करत आहेत.

सूत्रांनी असं देखील म्हटलं आहे की, रश्मिका आणि श्रीनिवास दोघं एकमेकांना डेट करत आहेत. तर एका सूत्रांनी असं देखील म्हटलं आहे की, रश्मिका आणि बेलाकमोंडा यांच्या टीमकडून यांबद्दल कोणतीच पुष्टी देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसात हे कपल मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांनी चांगलाच जोर घेतला आहे.

यानंतर रश्मिका आणि बेलाकमोंडानं एका पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर सोबतच एंट्री केली होती. त्यामुळे रश्मिका मंदाना बेलमकोंडा साई श्रीनिवासला डेट करत असल्याच्या अफवा एकाद्या झटक्यासारख्या असु शकतात. कारण तिची आणि विजय देवरकोंडा यांच्यात असलेली जवळीकता गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या बातमीच्या काही काळ आधी रश्मिका आणि देवकोंडायांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या होत्या, पण नंतर दोघांना एकत्र पाहून या बातम्या फेक असल्याचे उघड झालं होतं.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood