Home /News /entertainment /

'Arjun Reddy' फेम 'शिवा' ने सोडली चित्रपटसृष्टी, केलं धक्कादायक ट्विट

'Arjun Reddy' फेम 'शिवा' ने सोडली चित्रपटसृष्टी, केलं धक्कादायक ट्विट

अनेकवेळा असं झालेलं आहे, की कलाकारांनी यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर यू टर्न घेत या ग्लॅमरस दुनियेला रामराम केलं आहे.

    मुंबई, 6 फेब्रुवारी-   चित्रपटसृष्टी   (Film Industry)  म्हटलं की प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्या समोर येतो तो म्हणजे या कलाकारांचा ग्लॅमर, (Glamour)  त्यांचं आरामदायी आयुष्य आणि त्यांची संपत्ती. परंतु बऱ्याचवेळा या सर्वांच्या पलीकडे जात त्या कलाकाराचं एक वेगळं आयुष्यसुद्धा असतं, हे लोक विसरून जातात. अनेकवेळा असं झालेलं आहे, की कलाकारांनी यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर यू टर्न घेत या ग्लॅमरस दुनियेला रामराम केलं आहे. आज आपण अशाच एका कलाकारबद्दल जाणून घेणार आहोत. त्या कलाकाराचं नाव आहे राहुल रामकृष्ण   (Rahul Ramakrishna) . गीता गोविंद   (Geeta Govind)  फेम या अभिनेत्याने मनोरंजनसृष्टी सोडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेता राहुल रामकृष्णने शुक्रवारी (5 फेब्रुवारी 2022) संध्याकाळी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून आपण चित्रपटसृष्टी सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याने आपल्या ट्विटरवर एका छोट्या नोटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनतर त्याचे चाहते हैराण झाले आहेत आणि त्याला त्याच्या निर्णयामागील कारण सांगण्याची विनंती करत आहेत. राहुलने ट्विट करत लिहिलं आहे, ‘2022 माझं शेवटचं आहे.. मी आता आणखी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही. असं अजिबात नाही की मला या निर्णयाची चिंता आहे. आणि इतर कोणालाही याबद्दल चिंता नसावी. त्याच्या या पोस्टवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. परंतु अभिनेत्याने यामागचं कारण अजूनही सांगितलेलं नाही. राहुल रामकृष्णने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात थारुण भास्कर धश्याम दिग्दर्शित 'सैनमा' या लघुपटातून केली होती. त्यानं श्रीनिवास रेड्डी आणि पूर्णा स्टारर 2016 च्या जयमु निश्चमु रा चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तो विजय देवरकोंडा स्टारर 'अर्जुन रेड्डी' मध्ये देखील दिसला होता जो एक सुपरहिट चित्रपट होता. आणि त्यात राहुलच्या अभिनयाचं देखील कौतुक झालं होतं. या चित्रपटात तो शिवाच्या जिवलग मित्राच्या भूमिकेत होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.तसेच राहुल 'गीता गोविंद' या चित्रपटातदेखील विजय देवरकोंडाच्या मित्राच्या भूमिकेत होता. या दोन्ही चित्रपटांमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South indian actor

    पुढील बातम्या