S M L

VIDEO: आता अजगरला कसं पकडायचं ते विद्युत जामवालच्या या ट्रिकने तुम्हीही शिकाल

हा व्हिडीओ जंगली सिनेमाच्या सेटवर आहे. यात विद्युत प्रेक्षकांना अजगराशी मैत्री कशी करावी याबद्दल सांगताना दिसत आहे.

Updated On: Mar 15, 2019 06:31 AM IST

VIDEO: आता अजगरला कसं पकडायचं ते विद्युत जामवालच्या या ट्रिकने तुम्हीही शिकाल

मुंबई, १४ मार्च २०१९- बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. त्याचा आगामी जंगली सिनेमातही तो एकाहून एक सरस स्टंट करताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमात विद्युतने जंगलातील प्राण्यांसोबत अनेक सीन शूट केले आहेत. गुरुवारी जंगली पिक्चर्सने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आणि विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. यात विद्युत जंगलात अजगर पकडताना आणि त्याच्याशी मैत्री करताना दिसत आहे.

 


Loading...
View this post on Instagram
 

Into the wild, befriending the real junglees with the basic principles of Kalaripayattu! #Junglee #BeJunglee 🐘 @jungleepictures @jungleemovie #ChuckRussell @iampoojasawant @asha.bhat


A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal) on

हा व्हिडीओ जंगली सिनेमाच्या सेटवर आहे. यात विद्युत प्रेक्षकांना अजगराशी मैत्री कशी करावी याबद्दल सांगताना दिसत आहे. विद्युत म्हणाला की, तुम्हाला याच्यासोबत फार प्रेमाने वागायला हवं ज्यामुळे तुम्ही त्याला इजा पोहोचवत आहात असं वाटता कामा नये. तसेच त्याला इतकं घट्ट पकडा की, तो तुम्हाला डंश करणार नाही. सर्वच मूक प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे. पाहा अजगरासोबतचा विद्युतचा हा खास व्हिडीओ...

जंगली प्रोडक्शनच्या या सिनेमात हत्ती (भोला) आणि मनुष्य (राज- विद्युत) यांच्यातील मैत्री आणि शिकाऱ्यांच्या तावडीतून जंगलाला वाचवण्यासाठीची कथा सांगण्यात आली आहे. येत्या २९ मार्चला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 06:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close