भरलेला सिलेंडर घेऊन विद्युत जामवालनं केला खतरनाक स्टंट, पाहा VIDEO

भरलेला सिलेंडर घेऊन विद्युत जामवालनं केला खतरनाक स्टंट, पाहा VIDEO

एका भरलेल्या सिलेंडरचं वजन खूप जास्त असतं. त्यामुळे सिलेंडरसोबत वर्काआउट करणं अजिबात सोप्पं नसतं. त्यामुळे असा स्टंट तुम्ही ट्राय करु नये असा आमचा सल्ला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : बॉलिवूडमध्ये आपण अनेक अभिनेत्यांना स्टंट सीन करताना पाहतो. कोण कार उडवतात, तर कोण 25-30 गुंडांना एकटा मारतो. मात्र हे सर्व मोठ्यापडद्यावर जेवढं चांगलं दिसत तेवढं ते रिअल लाइफमध्ये करणं खूपच कठीण आहे. मात्र बॉलिवूडचा असा एक अभिनेता आहे जो अशक्य अशा स्टंटनाही शक्य करुन दाखवू शकतो. या अभिनेत्याचं नाव आहे विद्युत जामवाल. विद्युत अनेकदा त्याचे स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण नुकताच त्यानं एक असा स्टंट केला आहे जो पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल.

विद्युतनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुध्ये तो सिलेंडर हातात पकडून त्याला फुटबॉल प्रमाणं मागे-पुढे आणि गोल-गोल फिरवताना दिसत आहे. 40 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये विद्युत एकदाही थांबला नाही. या व्हिडीओमध्ये त्याचं कमावलेलं शरीर स्पष्ट दिसतं. हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना विद्युत लिहितो, ‘आता हे करुन दाखवा, ज्यांना विश्वास नाही त्यांच्यासाठी सांगतो, हा सिलेंडर पूर्ण भरलेला आहे. तुमची बॉडी ट्रेन होण्यासाठी तयार असते मात्र तुमच्या मेंदूला हे माहित नसतं, त्यामुळे कारणं शोधणं सोडून द्या’

‘सुहाना ड्रेस ठीक करो’, अंगप्रदर्शन न करण्याचा शाहरुखच्या लेकीला सल्ला

हा व्हिडीओ शेअर करताना विद्युतनं त्याला #ITrainLikeVidyutJammwal असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच अवाक झाले आहेत तर दुसरीकडे काही लोकांनी यावरुन विद्युतला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलं, जेव्हा माझी आई बोलते, गाडीवाला आला आहे सिलेंडर घरातून खाली घेऊन जा. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, विद्युत जमवाल अशाप्रकेरचे चॅलेज देऊ नकोस. भरलेल्या  सिलेंडरसोबत असा स्टंट करण जीवघेणं ठरु शकतं. आम्हाला माहीत आहे की तू खूप मेहनती आहेस मात्र असं काही करु नकोस.

Bigg Boss विनर शिवला वाढदिवसाच्या अगोदरच वीणानं दिलं ‘हे’ खास सरप्राइझ गिफ्ट

एका भरलेल्या सिलेंडरचं वजन खूप जास्त असतं. त्यामुळे सिलेंडरसोबत वर्काआउट करणं अजिबात सोप्पं नसतं. त्यामुळे असा स्टंट तुम्ही ट्राय करु नये असा आमचा सल्ला आहे. विद्युतनं शेवटचं 'जंगली' सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर तो सध्या कमांडो 3 ची तयारी करत आहे. हा सिनेमा लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनुष्काशी पहिल्याच भेटीत विराटनं केली होती 'ही' चूक, अशी होती तिची प्रतिक्रिया

==================================================================

VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...

Published by: Megha Jethe
First published: September 6, 2019, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading