Home /News /entertainment /

 ‘चुकूनही घेऊ नका पंगा...’; हा बॉलिवूड अभिनेता आहे जगातील सर्वात घातक फायटर

 ‘चुकूनही घेऊ नका पंगा...’; हा बॉलिवूड अभिनेता आहे जगातील सर्वात घातक फायटर

ब्रूस ली, जॅकी चॅन यांना विसरा... पाहा या बॉलिवूड अबिनेत्याची फाईट; मिळालं जगातील सर्वात खतरनाक फायटर्सच्या यादीत स्थान

  मुंबई 29 मे: विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) हा बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अॅक्शन हिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारचे स्टंट आणि धमाकेदार फाईटिंग स्टाईलच्या जोरावर त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकदा त्याची तुलना ब्रूस ली, जॅकी चॅन, जेट ली, टोनी झा (Bruce Lee, Jackie Chan, Jet Lee, Tony Zha) यांसारख्या हॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्यांशी देखील केली जाते. अशा या स्टंटबाज अभिनेत्याला आता जगातील सर्वात खतरनाक फायटर्सच्या यादीत स्थान मिळालं आहे.
  गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी; ही चिमुरडी आज आहे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री विद्यूत जामवाल हा सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ  शेअर करत असतो. या व्हिडीओद्वारे तो प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे स्टंट दाखवतो. अनेकदा त्याचे हे स्टंट जीवघेणे देखील असतात. अन् यामुळंच या धाडसी अभिनेत्याला जगातील सर्वात खतरनाक फायटर्सच्या यादीत स्थान मिळालं आहे. यापूर्वी या यादीत की चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीवन सीगल, डोनी येन, टोनी जा यांची नाव झळकत होती. पण आता या महान कलाकारांच्या पंक्तित आता विद्युतला देखील स्थान मिळालं आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्याने एक स्क्रीनशॉट जोडून ‘जय हिंद, कलारीपयट्टू’ असं लिहिलंय. गुगलवर ‘टॉप मार्शल आर्टिस्ट इन इंडिया’ असं सर्च केल्यानंतर आलेला हा फोटो आहे. यात सगळ्यात पुढे विद्यूतचं नाव दिसून येत आहे. ‘रस्ता म्हणजे शौचालय आहे का?’ कुत्रे फिरवणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्याचा सवाल
  विद्युतनं जुडो, कराटे, कुंग-फु आणि कलरीपट्टू या फाईटिंग स्टाईलचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे. त्याचे वडील भारतीय सैन्यात होते त्यामुळं लहानपणापासूनच त्याला व्यायामाची आवड निर्माण झाली. 3 वर्षांचा असल्यापासून तो मार्शलआर्ट शिकत आहे. त्याच्या कमांडो या चित्रपटातील स्टंट पाहून जॅकी चॅन देखील अवाक् झाला होता. सध्या त्याचा हा नवा स्टंट चर्चेत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment

  पुढील बातम्या