'डर्टी पिक्चर'नंतर या विरोधी व्यक्तिमत्त्वाच्या बायोपिकमध्ये दिसणार विद्या बालन

'डर्टी पिक्चर'नंतर या विरोधी व्यक्तिमत्त्वाच्या बायोपिकमध्ये दिसणार विद्या बालन

विद्या बालन होणार गिनिज बुकमध्ये नोंद असलेला ह्यूमन कम्प्युटर.

  • Share this:

मुंबई, 8 मे : मागच्या काही दिवसांपासून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर तयार असलेल्या वेब सीरिजमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री विद्या बालन आता एका नव्या बायोपिकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारताच्या गणित तज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जात असून या सिनेमात विद्या बालन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अनु मेमन या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून हा सिनेमा 2020च्या मे पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. याची माहिती विद्या बालननं ट्विटरवर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत दिली.

ह्यूमन कम्प्युटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताच्या महान गणितीतज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे 1982मध्ये त्यांचं नाव 'द गनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोदवलं गेलं. कोणत्याही प्रकारचं प्राथमिक शिक्षम न घेतलेल्या शकुंतला देवी यांचा गणितातील वेग वाखाण्याजोगा होता. त्यामुळेच त्यांना मानवी संगणक (Human Computer) असं नाव पडलं. त्यामुळे सर्वांतच्याच मनात त्यांच्या बायोपिकबाबत उत्सुकता आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर बायोपिकमध्ये काम केल्यानंतर विद्याचा हा दुसरा बायोपिक आहे. त्यामुळे या भूमिकेत विद्याला पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.या सिनेमाविषयी बोलताना विद्या म्हणाली, 'शकुंतला देवी यांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. त्या एक अशा व्यक्ती होत्या ज्यांनी आपल्यातील सुप्त गुण ओळखून त्याला जगासमोर मांडलं. स्वतःला प्रोत्साहन दिलं. ती एक खंबीर महिला होत्या. त्यांना हे यश आणि हा सन्मान सहजरित्या मिळालेला नाही. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. त्यामुळे अशा महान महिलेची व्यक्तीरेखा मला साकारायला मिळत आहे याचा अभिमान वाटतो.'

...म्हणून पुन्हा एकदा शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'ची सोशल मीडियावर चर्चा


दबंगची मुन्नी आउट, आता सलमानच होणार 'बदनाम'


VIDEO : बेबी ससेक्सची पहिली झलक, ब्रिटनचा नवा राजपुत्र दिसतो कसा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 09:00 PM IST

ताज्या बातम्या