मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'अमेझिंग होऊ शकते मग नॉर्मल का बनू', विद्या बालनच्या Shakuntala Devi चा हटके ट्रेलर

'अमेझिंग होऊ शकते मग नॉर्मल का बनू', विद्या बालनच्या Shakuntala Devi चा हटके ट्रेलर

शकुंतला देवी (Shakuntala Devi) फिल्म 31 जुलैला ऑनलाईन रिलीज होणार आहे.

शकुंतला देवी (Shakuntala Devi) फिल्म 31 जुलैला ऑनलाईन रिलीज होणार आहे.

शकुंतला देवी (Shakuntala Devi) फिल्म 31 जुलैला ऑनलाईन रिलीज होणार आहे.

मुंबई, 15 जुलै : 'डर्टी पिक्चर'मध्ये सिल्क स्मिता, 'तुम्हारी सुलु'ची सुलोचना आणि आता ह्युमन कॉम्प्युटर 'शकुंतला देवी' (Shakuntala Devi) म्हणून अभिनेत्री विद्या बालन पडद्यावर आणखी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 'शकुंतला देवी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये विद्या बालनचा (Vidya Balan) जबरदस्त आणि हटके अंदाज दिसून येतो आहे.

शकुंतला देवी चित्रपट ऑनलाईन रिलीज होणार आहे. अमेजन प्राइम व्हिडीओवर 31 जुलैला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाता ट्रेलर रिलीज झाला आहे.

" isDesktop="true" id="464556" >

गणितातील अंकांसह खेळणाऱ्या गणिती तज्ज्ञ शकुंतला देवी यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. शकुंतला देवी गणितात इतक्या तरबेज आणि बुद्धिमान होत्या की त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हटलं जायचं. विद्या बालन याच शकुंतला देवींची भूमिका बजावणार आहे. चित्रपटात विद्या बालनसह जिशु सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा ​​आणि अमित साध प्रमुख भूमिकेत आहेत. सान्या मल्होत्रा शकुंतला देवींच्या मुलीची भूमिका निभावणार आहे.

हे वाचा - सौंदर्याने घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रींची झाली आहे Plastic Surgery

चित्रपटाचा ट्रेलरमध्ये विद्या बालनचा बिनधास्त आणि जबरदस्त अंदाज पाहून आता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

First published:

Tags: Vidya Balan