मुंबई, 18 जुलै : सध्याच्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेलं वादग्रस्त टिकटॉक अॅपनं फक्त सामान्यांनाच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटींनाही वेड लावलं आहे. काही बॉलिवूड कलाकारांना हे अॅप आवडत नसलं तरीही अभिनेत्री विद्या बालन त्या कलाकारांपैकी आहे. ज्यांना हे अॅप वापरायला आवडतं. विद्यानं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर टिकटॉक अॅपचा एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ खूप गंमतीशीर आहे. ज्यात ती शास्त्रांचं ज्ञान देताना दिसत आहे. सध्या विद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विद्या बालननं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती पंडितजींच्या आवाजात लिपसिंक करताना दिसत आहे. ‘शास्त्रों के अनुसार, हर कुंवारी लड़की में नौ देवियों का वास होता है. लेकिन शादी के बाद कौन सी देवी एक्टिव होगी, ये पति के कर्मों पर निर्भर करता है.’ असा तो डायलॉग आहे. विद्यानं या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलं, काही ‘टॅकटुक टाइमपास’ हा व्हिडिओ अवघ्या काही तासात 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर विद्याच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.
लग्नाआधीच अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, लोकांना कळल्यावर उचललं ‘हे’ पाऊल
विद्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं तर ती काही दिवसांपूर्वी साउथ सुपरस्टार आणि राजकीय नेता एनटीआर यांच्या बायोपिकमध्ये दिसली होती. त्यानंतर तिचा ‘मिशन मंगल’ येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेमन यांच्याही प्रमुख भूमिका आहे. या सिनेमात इस्रोच्या वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. याशिवाय विद्या लवकरच इंदिरा गांधी यांच्यावर बनत असलेल्या वेब सीरिजमध्येही दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
'असा' घेणार विक्रांत सरंजामे सगळ्यांचा निरोप
कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन शरद पोंक्षेंचं रंगभूमीवर कमबॅक
======================================================================
भात लावणीचा आधुनिक मुळशी पॅटर्न काय आहे? पाहा SPECIAL REPORT