विद्या बालन म्हणाली, 'दिग्दर्शक मला एकटीला रूममध्ये घेऊन गेला आणि...'

विद्या बालन म्हणाली, 'दिग्दर्शक मला एकटीला रूममध्ये घेऊन गेला आणि...'

तो अनुभव विद्यासाठी एवढा वाईट होता की तिने सहा महिने स्वतःचा चेहरा आरशात पाहिला नव्हता.

  • Share this:

बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री विद्या बालनने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करतानाचा एक अनुभव सांगितला. तो अनुभव विद्यासाठी एवढा वाईट होता की तिने सहा महिने स्वतःचा चेहरा आरशात पाहिला नव्हता. विद्याचा हा अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती. तेव्हा तिने हिंदी सिनेसृष्टीत पाऊलही ठेवलं नव्हतं. ती आई- वडिलांसोबत चेन्नईमध्ये या निर्मात्याकडून त्या निर्मात्याच्या ऑफिसच्या फेऱ्या मारत होती.

प्रचंड संघर्ष केल्यानंतर तिला मल्याळम आणि तमिळ भाषेतील सिनेमे मिळायला सुरुवात झाली. मात्र अचानक तिला अनेक सिनेमांमधून काढून टाकण्यात आलं. याच्या मागे एक फार विचित्र कारण होतं. त्याचं झालं असं की, विद्याला कास्टिंग काउचचा वाईट अनुभव आला. तिथे घडलेल्या घटनेनंतर तिला फक्त सिनेमांमधून काढून टाकण्यात आलं नाही तर तिच्या शरीरावरही भाष्य करण्यात आलं.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने तिचे हे कटू अनुभव सांगितले. विद्याने सांगितलं की, तिच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या. काही सिनेमांच्या चित्रीकरणालाही तिने सुरुवात केली होती. मात्र एक दिवस एका दिग्दर्शकाने तिला सिनेमाबद्दल बोलायचे आहे असं सांगून बोलावले. विद्याने कॉफी शॉपमध्ये जाण्याबद्दल सांगितले असता त्या दिग्दर्शकाने तिला सतत रूमवर येण्याचा आग्रह केला.

थोड्यावेळाने विद्याने दिग्दर्शकाची निती ओळखली आणि त्याला अद्दल घडवण्याचं ठरवलं. ती दिग्दर्शकासोबत रूममध्ये गेली. मात्र रूममध्ये जाताना तिने दरवाजा उघडा ठेवला. रूममध्ये गेल्यानंतर काही वेळ दिग्दर्शकाने सर्वसामान्य गोष्टींवर चर्चा केली. मात्र वेळ, विद्याची बोलण्याची पद्धत, विद्याचे हावभाव आणि उघडा दरवाजा पाहून तो स्वतः रूमच्या बाहेर गेला.

विद्याच्या अशा वागण्यामुळे तिच्या हातून तो सिनेमा गेला. अशाच प्रकारच्या अनेक घटना तिच्यासोबत घडल्या. विद्याच्या हातात तेव्हा सुमारे 10 सिनेमे होते. मात्र अर्ध्याहून जास्त सिनेमांतून तिला काढण्यात आलं. चेन्नईमध्ये जेव्हा विद्याचे आई- बाबा निर्मात्यांकडे तिला सिनेमांतून काढून टाकण्याचं कारण विचारायचे तेव्हा निर्माते तिचा फोटो दाखवून, 'ती कोणत्या अंगाने अभिनेत्री दिसते' असा उलट प्रश्न विचारायचे.

सहा महिने आरशात पाहिलं नाही स्वतःचा चेहरा-

यानंतर विद्या म्हणाली की, 'मी त्यांना अनेक वर्ष माफ केलं नव्हतं. पण आता मी त्यांचे आभार मानते कारण त्यांनीच मला स्वतःला आहे तसं स्वीकारण्याचं आणि स्वतःवर प्रेम करण्याचं कारण दिलं.' विद्याच्या मते, अनेक तमिळ निर्मात्यांनी तिला कुरूपदेखील म्हटलं होतं. यामुळे तिने जवळपास सहा महिने स्वतःचा चेहरा आरशात पाहिला नव्हता.

...आणि अचानक अक्षय कुमारच्या मुलाच्या मागे लागले भिकारी

'हर बार पंजाबी क्यों, इस बार मराठी में होगा!' Dream Girl चं प्रमोशन साँग मराठीत!

'काही दिवसांनी तर तुला लग्नच करायचं आहे', शाहरुखच्या मुलीला मिळाला अजब सल्ला!

अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप, प्रेग्नंट असल्याची झाली होती चर्चा

VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

Published by: Madhura Nerurkar
First published: August 26, 2019, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading