फोटोग्राफर डब्बू रत्नानीसाठी विद्या बालननं पहिल्यांदा 2011 मध्ये फोटोशूट केलं होतं. त्यावेळी तिनं टॉपलेस फोटोशूट केलं होतं. पण 2015 मध्ये मात्र तिनं न्यूड फोटोशूट करत सर्वांनाच चकित केलं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विद्याच्या या फोटोंमध्ये तिनं एका उशीच्या सहाय्यानं बॉडी कव्हर केली आहे. या फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा खूपच वेगळी दिसत आहे. विद्या बालनचा पहिला हिट सिनेमा होता परिणीता. या सिनेमात ती सैफ अली खानसोबत दिसली होती. या सिनेमानंतर तिनं पुन्हा कधीच मागे वळू पाहिलं नाही. तिनं पा, डर्टी पिक्चर, डेढ़ इश्किया, परिणीता, भूल भुलैया, कहानी, नो वन किल्ल्ड जेसिका, हमारी अधूरी कहानी, मिशन मंगल या सिनेमांमध्ये काम करत आपल्या शानदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकली. तिच्या अभिनयासाठी तिला एकदा राष्ट्रीय पुरस्कार आणि 5 वेळा फिल्म फेअर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे.Licence To Chill 🌀💤 @vidya_balan #25yearsofdabbooratnani 📸 @DabbooRatnani @ManishaDRatnani #dabbooratnanicalendar 📸❤️🗓 #vidyabalan @Dabboo #dabbooratnani #dabbooratnaniphotography #dabbooarchives 📸 #quarantineandchill #lockdown pic.twitter.com/zfWni5FQhZ
— DABBOO RATNANI (@DabbooRatnani) May 26, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Vidya Balan