विद्या बालन साकारणार सर्वात प्रभावी पंतप्रधानांची भूमिका

'तुम्हारी सुलू' झाल्यानंतर आता विद्या बालन नव्या भूमिकेसाठी सज्ज झालीय. ती म्हणजे इंदिरा गांधींची भूमिका. भारताच्या माजी पंतप्रधानांची भूमिका विद्या करणारेय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 11, 2018 04:25 PM IST

विद्या बालन साकारणार सर्वात प्रभावी पंतप्रधानांची भूमिका

11 जानेवारी : 'तुम्हारी सुलू' झाल्यानंतर आता विद्या बालन नव्या भूमिकेसाठी सज्ज झालीय. ती म्हणजे इंदिरा गांधींची भूमिका. भारताच्या माजी पंतप्रधानांची भूमिका विद्या करणारेय.

पत्रकार सागरिका घोष यांच्या 'इंदिरा: इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकावर सिनेमा बनतोय. विद्या बालनचीच निर्मिती संस्था हा सिनेमा बनवणार आहे. विद्या म्हणाली, मला बरीच वर्ष इंदिराजींची भूमिका करायची होती. आता ही संधी मिळाली. यावर सिनेमा बनेल की वेब सीरिज हे अजून ठरायचंय.

देशाच्या सर्वात शक्तिमान पंतप्रधानांची भूमिका साकारणं, हे विद्यापुढे मोठं आव्हान असणारेय. आता विद्याचा हा नवा अंदाज कसा वाटतोय, हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...