मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Pulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया

Pulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया

पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर तर बंदी घातली गेली. अभिनेत्री विद्या बालननं पुलवामा हल्ल्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय.

पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर तर बंदी घातली गेली. अभिनेत्री विद्या बालननं पुलवामा हल्ल्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय.

पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर तर बंदी घातली गेली. अभिनेत्री विद्या बालननं पुलवामा हल्ल्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय.

मुंबई, 23 फेब्रुवारी : पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर सगळीकडूनच पाकिस्तानाचा निषेध होतोय. पाकिस्तानी कलाकारांवर तर बंदी घातली गेलीच, शिवाय अनेक स्टार्सनी शहिदांच्या कुटुंबाला मदतही केली. अनेकांनी भारतीय सिनेमे पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय घेतलाय.

अभिनेत्री विद्या बालननं पुलवामा हल्ल्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय. विद्या म्हणाली, 'आता निर्णायक पाऊल उचलण्याची वेळ आलीय. खरं तर कलेला कुठली सीमा नसते. धर्म नसतो. देश नसतो. पण आता अति झालंय.' विद्या बालनच नाही तर अनेक कलाकारांनी पाकिस्तानाचा उघड निषेध केलाय.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे हल्ल्याचे पुरावे मागण्यात आले आणि चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ठेवला. नेमकी याच गोष्टीवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्माने इमरान खान यांच्यावर निशाणा साधला. राम गोपाल वर्माने ट्विट करत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना एक प्रश्न विचारला की, जर बोलून प्रश्न सुटत असते तर तुम्ही तीन लग्न का केली.

साउथ आशिया टेरेरिझम पोर्टल (SATP)  ही संस्था दहशतवादाचा अभ्यास करणारी संस्था आहे. या संस्थेकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधली स्थिती सर्वाधिक हिंसक झाल्याचं म्हटलं आहे.

2018 मध्ये छोटे आणि मोठे 205 हल्ले झाले होते. तर 2017 मध्ये हिंसाचाराच्या एकूण 164, 2016 मध्ये 112, 2015 मध्ये 88 आणि 2014 मध्ये 90 घटना घडल्या होत्या. 2019 च्या दोन महिन्यांमध्ये दहशवादी हल्ल्याच्या 16 घटना घडल्या होत्या.

News18 ने जेव्हा या सगळ्या घटना आणि आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की 2 अतिरेक्यांच्या खात्मा करताना एका जवानाला शहीद व्हावं लागलं. तर 82 अतिरेक्यांमागे 18 स्थानिक नागरिक ठार झाले. नोव्हेंबर महिन्यात सुरक्षा दलांनी 107 तर डिसेंबर महिन्यात 105 अतिरेकी ठार केले.

हल्ल्यानंतर टोटल धमाल, गली बॉय, लुका छुपी, नोटबुक आणि कबीर सिंह या सिनेमाचं रिलीज पाकिस्तानात नाही करायचा निर्णय झाला.

तीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत?

First published:

Tags: Jammu kashmir, Pulwama attack, Pulwama terror attack, Terror attack, Vidya Balan, पुलवामा, विद्या बालन