झारखंडमध्ये रिलीजआधीच 'बेगम जान' 'टॅक्स फ्री'

'बेगम जान' चित्रपटाचं सर्वाधिक चित्रिकरण झारखंडमध्येच झालं आहे. झारखंड सरकारने या चित्रपटासाठी २ कोटींची सबसिडी देण्याचंही जाहीर केलंय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2017 10:56 PM IST

झारखंडमध्ये रिलीजआधीच 'बेगम जान' 'टॅक्स फ्री'

10 एप्रिल : झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी विद्या बालनचा 'बेगम जान' चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय सिनेमाच्या रिलीज डेट म्हणजेच १४ एप्रिल पासूनच लागू होईल.

'बेगम जान' चित्रपटाचं सर्वाधिक चित्रिकरण झारखंडमध्येच झालं आहे. झारखंड सरकारने या चित्रपटासाठी २ कोटींची सबसिडी देण्याचंही जाहीर केलंय. त्यातील पहिल्या स्वरुपाचा 50 लाख रुपयांचा चेक निर्माते महेश भट्ट यांना देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या बालन झारखंडची ब्रँड अॅम्बेसेडरसुद्धा बनु शकते. याबाबतची घोषणा लवकरात लवकर होईल.

विद्या बालनच्या 'बेगम जान' सिनेमाची कथा भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी दरम्यान घडलेल्या सत्य कथेवर आधारित आहे. सिनेमा श्रीजीत मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला असून तो १४ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 10:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...