मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Hrithik Roshan च्या गाण्यावर महिलेने केला जबरा डान्स, युजर्स म्हणाले...

Hrithik Roshan च्या गाण्यावर महिलेने केला जबरा डान्स, युजर्स म्हणाले...

बॉलीवूड स्टार अभिनेता ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan ) 'बॅंग बॅंग' या गाण्यावर एक महिला जबरा डान्स करताना दिसत आहे.

बॉलीवूड स्टार अभिनेता ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan ) 'बॅंग बॅंग' या गाण्यावर एक महिला जबरा डान्स करताना दिसत आहे.

बॉलीवूड स्टार अभिनेता ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan ) 'बॅंग बॅंग' या गाण्यावर एक महिला जबरा डान्स करताना दिसत आहे.

मुंबई, 27 डिसेंबर: सोशल मीडिया (Social media) असा प्लॅटफॉर्म आहे. जिथे कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेक मजेशीर गोष्टी व्हायरल होत असतात. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये एक महिला बॉलीवूड स्टार अभिनेता ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan ) गाण्यावर जबरा डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स पाहून 'आराम से दीदी' अशी कमेंट करत आहेत.

इंटरनेटवर व्हायरल हा व्हिडीओ कोण्यातरी पार्टीमधील असून पार्टीत काही लोक ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. तेव्हा अचानक बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचं 'बॅंग बॅंग' गाणं लागतं. जे ऐकून सगळेच आणखी जोशाने डान्स करू लागतात. त्यातीलच एक महिला मोठ्या उत्साहाने डान्स करु लागते तिचा डान्स पाहून सगळेच चकित होतात.

तिचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्रॉफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. काही युजर्स सोशल मीडियावर या महिलेच्या डान्सचे कौतुक करत आहेत, तर काहीजण व्हिडिओची खिल्ली उडवत आहेत.

यूजर्स अशा कमेंट करत आहेत

एका युजरने 'आयुष्य मोठे असले पाहिजे, मोकळेपणाने जगा', असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने 'अरे दीदी आरामात' असा सल्ला दिला आहे. तसेच आणखी एक युजरने , 'असा डान्स करण्यासाठी खूप हिंमत हवी, शाब्बास'. असे म्हटले आहे.

'बँग बँग' चित्रपटातील हे गाणे जे बेनी दयाल आणि नीती मोहन यांनी गायले आहे.

यापूर्वी, 2018 मध्ये मध्य प्रदेशची परदेशात राहणारे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू अंकल यांचा डान्स व्हायरल झाला होता. एका लग्नादरम्यान त्यांनी केलेल्या डान्समुळे ते एक रात्रीत प्रसिद्ध झाले होते.

First published:

Tags: Hritik Roshan