VIDEO : डान्स करता करता अचानक शाहरुखने काजोलला केलं Kiss; पाहून हसू लागला दिग्दर्शक

VIDEO : डान्स करता करता अचानक शाहरुखने काजोलला केलं Kiss; पाहून हसू लागला दिग्दर्शक

कतरिनासोबतचा शाहरुखचा एक व्हिडीओही सध्या खूप व्हायरल झाला आहे

  • Share this:

मुंबई, 27 जून : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. वास्तविक जीवनात दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडते. पडद्यावरील दोघांची केमिस्ट्रीही चांगली आहे.

दरम्यान, या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Kajol Shah Rukh Khan Viral Video). काजोल आणि शाहरुखचा हा व्हिडीओ दिलवाले या चित्रपटातील आहे. ज्यामध्ये दोघेही एकत्र नाचताना दिसत आहेत. पण, यादरम्यान काहीतरी घडते, जे पाहिल्यानंतर रोहित शेट्टीसमवेत सेटवरील सर्व लोक हसत आहेत.

हे वाचा-सलमान खाननं शेअर केला वर्कआउट PHOTO, सुशांतच्या चाहत्यांना राग अनावर

वास्तविक, शाहरुख खान डान्स प्रॅक्टिस दरम्यान काजोलला चुकून Kiss करतो. हे पाहून सेटवर उपस्थित सर्वजण हसू लागतात. काजोल आणि शाहरुखसुद्धा या घटनेने आश्चर्यचकित होतात आणि मग ते दोघेही हसू लागतात. दिलवाले हा चित्रपट रोहित शेट्टी याने दिग्दर्शित केला होता. यामध्ये काजोल आणि शाहरुख खान व्यतिरिक्त कृती सेनॉन आणि वरुण धवन देखील मुख्य भूमिकेत होते. शाहरुख आणि काजोलचा हा व्हिडीओ फिल्मफेअरने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

We never will get enough of watching #ShahRukhKhan and #Kajol on screen.

A post shared by Filmfare (@filmfare) on

हे वाचा-VIDEO : सीन संपल्यावरही कतरिनाला मिठीतून सोडायला तयार नव्हता शाहरुख खान

त्याआधी या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काजोल शाहरुख खानचे गाल खेचताना दिसत आहे. हा व्हिडीओ 'दिलवाले' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा होता. काजोल नुकतीच अजय देवगनसोबत 'तन्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटात दिसली होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्याच वेळी शाहरुख अखेर 'झिरो' मध्ये दिसला होता. ज्यामध्ये कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा त्याच्यासोबत होती.

First published: June 27, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या