VIRAL VIDEO: न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर दीपिका चालवतेय सायकल

VIRAL VIDEO: न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर दीपिका चालवतेय सायकल

काही दिवसांपूर्वी दीपिकाचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

  • Share this:

मुंबई, 10 मे : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं नुकतीच मेट गालाच्या पिंक कार्पेटवर हजेरी लावली होती. मेट गाला 2019 पिंक रंगाचा बार्बी ड्रेस परिधान केला होता. तिच्या लुकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. एकीकडे आपल्या अत्रंगी लुक्समुळे सर्व सेलेब्रिटी ट्रोल होत असताना दीपिकानं मात्र आपल्या लुकनं सर्वांची मनं जिंकली. यानंतर आता ती कान्स फेस्टिव्हल 2019साठी तयार झाली आहे. पण रेड कार्पेटवर उतरण्याआधी दीपिकानं न्यूयॉर्कमध्ये सायकलिंगचा आनंद घेतला.

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सायकल चालवतानाचा दीपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकानं हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसत असून ती हे सायकलिंग खूप एंजॉय करत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

Night riders : Deepika Padukone enjoying a bicycle ride around Central Park with her trainer Nam in NYC. #deepikapadukone

A post shared by DEEPIKA PADUKONE FAN CLUB (@deepikafans.page) on

दीपिका सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. पण काही दिवसांसाठी शूटिंगमधून ब्रेक घेऊन ती 'मेट गाला'साठी न्यूयॉर्कला गेली. मात्र याठीकाणी मेकअपच्या वेळी दीपिकाला काही समस्यांना समोर जावं लागलं कारण ती यावेळीही सिनेमाच्या भूमिकेतच वावरत होती. 'मेट गाला'मध्ये दीपिकानं  shimmery candy-pink Zac Posen gown घातला होता.  दीपिकासोबतच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानंही मेट गालाला हजेरी लावली होती. मात्र तिचा लुक भारतात खूप ट्रोल झाला. तर दुसरीकडे लोकांनी दीपिकाला बार्बी गर्ल म्हणत तिचं कौतुक केलं होतं.

मेट गालाच्या नाइट पार्टीचा दीपिकाचा लुकही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी प्रियांका चोप्रा, निक जोनस, लीली सिंग, दीपिका पदुकोण यांनी कॅमेराला एकत्र पोझ दिली. हा फोटो प्रियांकानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Charlie and the Indian angels end the night... ❤️ #metgala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

आमिर खानची मुलगी झाली 21 वर्षांची, 'हे' आहेत तिचे कधीही न पाहिलेले फोटो

सर्वांसमोर शाहरुखने प्रियांकाला विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का?’, तिनं दिलं हे भन्नाट उत्तर

बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता पुरुषाच्याच प्रेमात ?

First published: May 10, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading