किती गोड! अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या लहानगीचा क्यूट VIDEO एकदा पाहाच

किती गोड! अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या लहानगीचा क्यूट VIDEO एकदा पाहाच

अमिताभ यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी पंजाबी गाण्यावर एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहिल्यावर कोणीही इम्प्रेस होईल कदाचित याच कारणानं बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या मुलीचे चाहते झाले आहेत. एवढंच नाही तर या मुलीचा व्हिडीओ त्यांनी रिट्वीट केला आहे. त्यामुळे आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या फिल्मी आणि टीव्ही शोसोबतच सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांचे विचार, कविता, फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अगदी काही दिवसांपूर्वी आजारी असतानाही ते सोशल मीडियावर सक्रिय होते.

...आणि शूटिंगच्या पहिल्याच दिवशी 'छपाक'च्या सेटवर ढसाढसा रडली दीपिका पदुकोण

अमिताभ यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी पंजाबी गाण्यावर एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे. तिचे हे क्यूट भाव पाहिल्यावर कोणीच तिचं कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. या मुलीचा हा व्हिडिओ शेअर करताना बिग बींनी लिहिलं, ‘वाह क्या बात है’

KBC स्पर्धकानं केलं ऐश्वर्याचं कौतुक, अमिताभ बच्चननी व्यक्त केली नाराजी

काही वेळापूर्वीच शेअर झालेल्या या व्हिडीओला 13 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अशाप्रकारे व्हिडीओ शेअर करण्याची अमिताभ यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात एक व्यक्ती कुत्र्यासोबत खेळताना दिसत होता.

प्रेमात वेड्या रवीनानं केला होता आत्महत्येचा प्रयत्न, अजय देवगणनं दिली होती धमकी

================================================================

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

First published: October 26, 2019, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading