पुन्हा एकदा मॉडेलिंग क्षेत्रात परतली शमीची पत्नी

2014 मध्ये लग्नानंतर नवऱ्याच्या सांगण्यावरून हसीनने मॉडेलिंग जगताला अलविदा म्हटले होते

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2018 05:53 PM IST

पुन्हा एकदा मॉडेलिंग क्षेत्रात परतली शमीची पत्नी

मुंबई, 08 जुलै: क्रिकेटर मोहम्मद शमीसोबतची पत्नी हसीन जहाँने पुन्हा एकदा मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. शमीशी लग्न होण्याआधी हसीन मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. मात्र लग्न झाल्यानंतर ती स्वतःहून या क्षेत्रापासून चार हात दूरच राहिली होती. पण आता मात्र तिने पुन्हा करिअरला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. हसीनने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोशूटसाठी वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे. पुन्हा एकदा मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू करण्याचा निर्णय तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीच्या भविष्यासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे.

सुमारे चार महिन्यापासून मोहम्मद शमी आणि हसीन दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आले आहेत. पण आता जुनं मागे सारून हसीनने मुंबईमध्ये एक फोटोशूट केले आहे. 2014 मध्ये लग्नानंतर नवऱ्याच्या सांगण्यावरून हसीनने मॉडेलिंग जगताला अलविदा म्हटले होते. मात्र आता ती पुन्हा एकदा मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नशीब आजमावयाला सज्ज झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हसीन म्हणाली की, शमीसाठी मी माझ्या स्वप्नांना मुरड घातली. करिअरही सोडले. पण त्याने मला एकटं पाडलं. पण आता मला पुन्हा स्वतःची ओळख बनवायची आहे. पलोकप्रिय होण्यासाठी मी मेहनत घेत आहे.

हसीन पुढे म्हणाली की, मॉडेलिंगमध्ये स्वतःचं नाव बनवण्यासाठी मी फार मेहनत घेतली होती. पण शमीच्या सांगण्यावरून मी या सर्वापासून दूर झाले. आता माझ्यावर मुलीची जबाबदारी आहे. यामुळेच मी मॉडेलिंगमध्ये पुन्हा काम करण्यास सुरूवात केली आहे. मला अनेक सिनेमे आणि लघुपटांच्या ऑफर्सही मिळत आहेत. हसीन याआधी आयपीएलमध्ये कोलकता नाइटरायडर्सची चिअर गर्लही होती. आता तिला मॉडेलिंगसोबत अभिनयातही आपले नशिब आजमावयाचे आहे. हसीनने 6 मार्च 2018 रोजी शमीचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध सुरू असल्याचा आरोप केला होता. हसीनने शमी आणि त्याच्या कुटुंबियांच्याविरोधात कलकत्तामध्ये तक्रार दाखल केली होती.

हसीनने शमीवर सातत्याने अनेक आरोप केले आहेत. यात मारहाण, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे अत्यंत गंभीर आरोपांचा समावेश आहे. तसेच शमी लवकरच दुसरं लग्न करणार असल्याचेही ती म्हणाली होती. मात्र हसीन फक्त एकामागोमाग एक आरोपच करत आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही असे स्पष्टीकरण शमीने दिले होते.

हेही वाचा:

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

मुंबई आणि इतर जिल्ह्यातील या 10 ठिकाणी कोसळतोय मुसळधार पाऊस

आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close