Home /News /entertainment /

VIDEO: वयाच्या 67 वर्षी तरुणींनाही लाजवेल असं वर्कआउट करतेय Hrithik Roshan ची आई, अभिनेत्याची भावुक पोस्ट

VIDEO: वयाच्या 67 वर्षी तरुणींनाही लाजवेल असं वर्कआउट करतेय Hrithik Roshan ची आई, अभिनेत्याची भावुक पोस्ट

बॉलिवूड स्टार्सच्या (Bollywood News Latest Update) आयुष्यात काय चालू आहे, याची त्यांच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. त्यांच्या चाहत्यांपर्यंत आपल्या लाडक्या कलाकारांच्या बातम्या पोहोचवण्यासाठी अनेक पापाराझी या कलाकारांचे विमानतळावरचे लूक्स, जिममधले लूक्स शेअर करत असतात

पुढे वाचा ...
मुंबई, 20 जानेवारी: बॉलिवूड स्टार्सच्या (Bollywood News Latest Update) आयुष्यात काय चालू आहे, याची त्यांच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. त्यांच्या चाहत्यांपर्यंत आपल्या लाडक्या कलाकारांच्या बातम्या पोहोचवण्यासाठी अनेक पापाराझी या कलाकारांचे विमानतळावरचे लूक्स, जिममधले लूक्स शेअर करत असतात. हे स्टार्स स्वतःही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही पोस्ट करतच असतात. या सगळ्यात काही कलाकारांचे आई-वडीलही मागे नाहीत. आपल्या मुलांप्रमाणे तेही स्वतःला फिट ठेवत असतात आणि सोशल मीडियावरही तेवढेच ॲक्टिव्ह असतात. याला हृतिक रोशनची 68 वर्षांची आई पिंकी रोशन याही अपवाद नाहीत. हृतिक रोशनने आपल्या आईचा वर्कआउट करतानाच व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हृतिकचे (Hrithik Roshan Latest News) वडील राकेश रोशन आणि हृतिक हे दोघे सिनेमा क्षेत्रात असले, तरी पिंकी यांनी कधीच कुठल्या चित्रपटात काम केलं नाहीये; पण अलीकडे सोशल मीडियावर त्या ॲक्टिव्ह असतात. त्यांचा मुलगा हृतिक तर फिटनेस फ्रीक म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्याचे वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याने नुकताच आपल्या आईचा वर्कआउट व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने चाहत्यांचेही आभारही मानले आहेत. या व्हिडीओमध्ये पिंकी रोशन ज्या ताकदीने वर्कआउट करताना दिसत आहेत, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आणि प्रेरणादायी आहे. हे वाचा-आलिया भट्टने पोस्ट केले Cute Photos, पण फोटोंपक्षा चर्चा अर्जुन कपूरच्या कमेंटची वयाच्या 68व्या वर्षीही त्यांचे हाय इंटेन्सिटी वर्कआउट पाहून लोक आश्चर्यचकित होतात. हृतिक रोशनने आपल्या आईचा वर्कआउट व्हिडीओ शेअर करताना एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात तो लिहितो, की 'मला आशा आहे, की आपल्या वयाच्या 68व्या वर्षीही तंदुरुस्त आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आईला आपलं सर्वस्व देताना पाहून, आपण सर्वजणसुद्धा वयाची पर्वा न करता सुदृढ बनण्याचा प्रयत्न करू. माझ्या आईच्या या अथक, आनंदी ध्यासाला पाठिंबा दिल्याबद्दल मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत. मला माहिती आहे, की तीदेखील वाईट काळातून गेली आहे, आपण सर्वच जात असतो. मी पाहिलं आहे, की तिच्यासाठी जिममध्ये जाणं आणि नवीन सुरुवात करणं किती कठीण होतं. परंतु तिनं हे करून दाखवलं. तुम्ही सर्वांनी तिला इन्स्टाद्वारे पाठिंबा दिला आहे. माझ्या आईला अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत केल्याबद्दल आभार मानण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. मी प्रार्थना करतो, की स्वत:ला सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न कर असलेल्या प्रत्येकालाच मित्रमंडळी आणि कुटुंबाचा असाच पाठिंबा मिळावा.'
पिंकी रोशन यांनी वयाच्या 58व्या वर्षी वर्कआउट करायला सुरुवात केली. या वयातही एवढं इंटेन्स वर्कआउट करण्याची त्यांची इच्छाशक्ती खरोखरच प्रेरणादायी असल्याची भावना चाहत्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे. हे वाचा-'पर्सनल गोष्ट घराबाहेर नको'; 'ये जवानी है...'ची अभिनेत्री 'त्या' PHOTOवरून ट्रोल हृतिकचे वडील राकेश आणि आई पिंकी यांची पहिली भेट त्यांच्या वडिलांमुळे झाली होती. पिंकी यांचे वडील ओमप्रकाश हे एक डायरेक्टर होते आणि त्यांचं रोशन यांच्या घरी नेहमी जाणं-येणं होतं. पिंकीच्या वडिलांनीच या दोघांचं लग्न जुळवलं होतं. राकेश रोशन यांनी 1970 मध्ये पिंकी यांच्याशी लग्न केलं. पिंकी यांनी 1972मध्ये एक मुलगी सुनैना रोशन आणि 1974 मध्ये मुलगा हृतिक रोशनला जन्म दिला.
First published:

Tags: Hritik Roshan

पुढील बातम्या