S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :'काॅलेज डायरी'च्या कलाकारांनी वितरकांना भररस्त्यावर चोपले
  • VIDEO :'काॅलेज डायरी'च्या कलाकारांनी वितरकांना भररस्त्यावर चोपले

    Published On: Mar 12, 2019 11:04 PM IST | Updated On: Mar 12, 2019 11:06 PM IST

    अद्वैत मेहता, पुणे, 12 मार्च : मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या काॅलेज डायरी सिनेमातील कलाकारांनी वितराकाला भररस्त्यावर बेदम चोप देण्याची घटना पुण्यातील पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर घडली.जितक्या थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित होते तितक्या थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्यानं कलाकारांनी वितरकांना मारहाण केली. चित्रपटाला थिअटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचं चित्रपटाचं दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या अनिकेत घाडगे यांचं म्हणणं आहे. काॅलेज डायरी हा सिनेमा राज्यातील 100 थिएटरमध्ये दाखवण्याचं आश्वासन वितरक असलेल्या योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांनी निर्मात्यांना दिलं होतं. तसंच त्याबाबतचे पैसे देखील घेतले होते. प्रत्यक्षात हा सिनेमा केवळ 45 थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close