• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO : अभिनेत्री नीना गुप्ता यांचा हॉट लूकमधील डान्स पाहून चाहते घायाळ

VIDEO : अभिनेत्री नीना गुप्ता यांचा हॉट लूकमधील डान्स पाहून चाहते घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिध्द आहेत. त्या आपल्या खास शैलीतील व्हिडिओ, छायाचित्रे नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Bollywood Actress Neena Gupta) अभिनयासोबतच स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व म्हणूनही प्रसिध्द आहेत. नीना गुप्ता या स्पष्टवक्तेपणा आणि बोल्ड स्टाईलसाठीही लोकप्रिय आहेत. त्या सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांची झलक त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून नेटिझन्सला पाहायला मिळत असते. नुकताच नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवरुन (Instagram) एक व्हिडिओ (Video) शेअर केला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटिझन्स सह अनेक बॉलिवूड कलाकारांनी पसंती दर्शवली आहे. याबाबतचे वृत्त `लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`ने दिले आहे. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिध्द आहेत. त्या आपल्या खास शैलीतील व्हिडिओ, छायाचित्रे नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचा हा अंदाज फॅन्सला आवडतो आणि त्यांच्या पोस्टवर कमेंटस तसेच लाइक्सचा पाऊस पडत असतो. सध्या त्यांचा असाच हटके शैलीतील एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओने देखील त्यांच्या फॅन्सवर भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून अनेक बॉलिवूड कलाकार त्यांचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओत नीना गुप्ता हॉट लूकमध्ये (Hot Look) डान्स करताना दिसत आहेत. अनोख्या लूकमधील हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर करताना नीना गुप्ता लिहितात, `आज फिर जीने की तमन्ना है`. या व्हिडिओत बॅकग्राउंडला हेच गाणं ऐकायला मिळते आणि या गाण्यावर त्या नृत्य करताना दिसतात. या व्हिडिओत नीना गुप्ता यांनी काळया रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्टस परिधान केले आहे. या ड्रेसमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. तसेच त्यांनी खाद्यावर काळ्या रंगाची बॅग घेतली असून, पायात काळ्या रंगाचे स्निकर्स घातले आहेत. शॉर्ट हेअर कट मुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हे ही वाचा-'छबीदार छबी, मी...' साडीमध्ये अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा
  View this post on Instagram

  A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

  त्यांचा हा डान्स व्हिडिओ सध्या चर्चेत असून, त्यांच्या या स्टायलिश लूकवर बॉलिवूड कलाकारही कॉमेंट करत आहेत. बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अलिया भटची (Alia Bhat) आई सोनी राजदान यांनी ‘वाह जी वाह’ अशी कॉमेंट या व्हिडिओवर केली आहे. याशिवाय बिदीता बाग, सचिन श्रॉफ यांनी रेड हार्ट शेअर करत पोस्ट लाइक केली आहे. तुम्ही 20 वर्षांच्या अभिनेत्रीलाही मागे टाकले आहे, अशी कॉमेंट एका चाहत्याने केली आहे. मॅडम तुमचे पाकिस्तानमध्ये खूप फॅन्स आहेत, असे दुसऱ्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहीले आहे. तुम्ही आमची मनं जिंकली असून, नव्या स्टार्सवरही मात केल्याचे फॅन्स आपल्या कमेंट मध्ये लिहितात.
  First published: