S M L

व्हिक्टोरिया अॅण्ड अब्दुल - गोष्ट राणी आणि गुलामाच्या मैत्रीची

या सिनेमात अली फजल हा अब्दुलची भूमिका साकारणार आहे. राणीच्या भूमिकेत जुडी डेन्च पहायला मिळणारेत.

Sonali Deshpande | Updated On: May 31, 2017 05:42 PM IST

व्हिक्टोरिया अॅण्ड अब्दुल - गोष्ट राणी आणि गुलामाच्या मैत्रीची

31 मे : 'व्हिक्टोरिया अॅण्ड अब्दुल' या अली फजलच्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. या सिनेमात अली फजल हा अब्दुलची भूमिका साकारणार आहे. या अब्दुलची राणी व्हिक्टोरियासोबत मैत्री होते, परंतु ही मैत्री राणीच्या राज्यातील लोकांना मात्र आवडत नाही.

तसंच या सिनेमात राणीच्या भूमिकेत जुडी डेन्च पहायला मिळणारेत. जुडी डेन्च यांची जेम्स बाँडच्या सिनेमांतील मॅडम एक्सची भूमिका तुमच्याही लक्षात असेल. खरं तर हा सिनेमा त्यातील कास्टिंगपासूनच चर्चेत आला होता.

भारतावर इंग्रजांचं राज्य असलेल्या काळातील ही गोष्ट आहे. ज्यामध्ये एक गुलाम असलेल्या अब्दुलबरोबर राणीची मैत्री होती. ज्यानंतर अब्दुलशिवाय राणीचा वेळच जात नाही. अनेक मुद्दांवर ती अब्दुलकडून सल्लाही घेते. त्यामुळे इतर लोकांमध्ये अब्दुलविषयी रोष तयार होतो.

'व्हिक्टोरिया अॅण्ड अब्दुल'  हा सिनेमा २२ सप्टेंबरला भारतात रिलीज होतोय. अली फजल या सिनेमाबाबत खूपच उत्सुक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 05:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close