मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विकी -कतरिनाच्या लग्नाला या अभिनेत्याने जाण्यास दिला नकार; पोस्ट लिहित सांगितलं कारण...

विकी -कतरिनाच्या लग्नाला या अभिनेत्याने जाण्यास दिला नकार; पोस्ट लिहित सांगितलं कारण...

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत दररोज नवनविन खुलासे होत आहेत.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत दररोज नवनविन खुलासे होत आहेत.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत दररोज नवनविन खुलासे होत आहेत.

मुंबई, 1 डिसेंबर : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत दररोज नवनविन खुलासे होत आहेत. विकी आणि कतरिना याच महिन्यात 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्या लग्नात सेल्फी काढण्यास मनाई असल्याची बातमी समोर आली होती. याच कारणामुळे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गजराज राव ( Gajraj Rao on Vicky Katrina Wedding) काहीसे नाराज झाले आहेत.

विकी-कतरिनाच्या लग्नात मोबाईल वापरण्यास बंदी

विकी कौशल आणि कतरिनाने अद्याप त्यांच्या लग्नाविषयी बोलणे टाळले आहे. मात्र चाहते आणि मित्र त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गजराज राव यांनी या जोडप्याच्या लग्नावर भाष्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वास्तविक, जोडप्याच्या लग्नात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची बातमी समोर आली होती. जेणेकरुन हे जोडपे स्वतः त्यांच्या लग्नाचे पहिले फोटो पोस्ट करू शकतील.

वाचा : प्रियांकाचा नवरा निक जोनस बॉलिवूडमध्ये करू शकतो एन्ट्री; फक्त एका गोष्टीची पाहतोय वाट

गजराज राव यांनी नाराजी व्यक्त केली

आता गजराज राव यांनी या नियमावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली असून लग्नाला उपस्थित न राहण्याबाबत बोलले आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या जोडप्याचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर 'लग्नात मोबाइलवर बंदी येईल' असे कॅप्शन लिहिले आहे.

वाचा : दिया मिर्झा दररोज करणार एक लाख दान; यामागचं कारण आहे खास

गजराजने विक्की कौशलसाठी लिहिलं आहे की, 'सेल्फी काढू देत नसाल तर मी लग्नाला येणार नाही. विकी कौशल आणि कतरिनाविषयी अशी देखील चर्चा रंगली आहे की, या दोघांनी राहण्यासाठी (Katrina and Vicky Dream Home) घर देखील निवडले आहे. लग्नानंतर ही जोडी स्वप्नाच्या घरात राहण्यास जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Vicky Kaushal, Katrina Kaif, Gajraj Rao, Gajraj Rao on Vicky Katrina Wedding, Mobile ban in Vicky and Katrina wedding, Vicky and Katrina Wedding, Katrina and Vicky Dream Home

विकी कौशलची चुलत बहीण डॉ. उपासना वोहरा यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'लग्नाच्या तयारीबाबत मीडियामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा बॉलिवूडमध्ये अनेकदा पसरतात. अलीकडेच मी माझ्या भावाशी बोललो. तसं काही नाही. या मुद्द्यावर मला काही बोलायचे नाही, पण सध्या दोघे लग्न करत नाहीत.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal