Home /News /entertainment /

विकी-कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची अशी प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाली अभिनेत्री

विकी-कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची अशी प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाली अभिनेत्री

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. या दोघांचा रोका झाल्याचाही दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal)  पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. या दोघांचा रोका झाल्याचाही दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. इतकंच नाही तर दोघांनी लग्नासाठी त्यांच्या वेडिंग ड्रेसची ऑर्डरही दिली आहे. विकीची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी  (Harleen Sethy)  हिने कतरिना-विक्कीच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. विकी-कतरिनाच्या लग्नाचा तिला अजिबात त्रास होत नसल्याचे ती म्हणाली. विकी आणि हरलीनच्या जवळच्या व्यक्तीने हरलीनच्या प्रतिक्रियेबद्दल हे सांगितले आहे.तसेच त्या व्यक्तीनं म्हटलं, हरलीन पूर्णपणे पुढे गेली आहे आणि तिच्या कामात व्यस्त आहे. काय म्हणाली हरलीन सेठी- सूत्राने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “हरलीन सेठी पुढे गेली आहे.ती तिच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, विकी-कतरिनाच्या लग्नावर प्रतिक्रिया देण्यासाठी हरलीन सेठी उपस्थित नव्हती. स्रोत पुढे म्हणाला, "मित्रांनी तिला विकीच्या कतरिना कैफसोबतच्या नात्याबद्दल आणि आगामी लग्नाबद्दल विचारले, यावर हरलीन म्हणाली - मला परत त्या झोनमध्ये न्हेऊ नका." एकता कपूरच्या 'द टेस्ट केस 2' मध्ये काम करण्यासाठी हरलीन सेठी खूप उत्सुक आहे. पहिला सीझन निम्रत कौरच्या भोवती फिरतो. तसाच 'टेस्ट केस 2' तिच्याभोवती फिरेल. हरलीनने अलीकडेच एका चित्रपटासाठी एक गाणे शूट केले आहे. ती आणखी एका वेब शोसाठी चर्चेत आहे." एकता कपूरच्या 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेब शोमध्ये काम केल्याबद्दल हरलीन सेठीचेही कौतुक झाले होते. का झाला होता विकी-हरलीनचा ब्रेकअप- अभिनेत्री हरलीन सेठी आणि अभिनेता विकी कौशल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. 2019 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. एका मुलाखतीत हरलीनने विकीच्या वागण्यात आलेला बदल हे ब्रेकअपचे कारण सांगितले होते. 'संजू' आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमांनंतर विकीच्या वागण्यात बदल झाला होता. असं तिचं म्हणणं आहे. अचानक त्याचे रंग बदलू लागले. त्यामुळे त्यांना ब्रेकअप करावे लागले असं तिनं सांगितलं आहे. (हे वाचा; कतरिना-विकी करतायेत लग्नाची तयारी? 'या'ठिकाणी दिसले एकत्र, जाणून घ्या ...) विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, मीडिया रिपोर्टनुसार, दोघे राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या सिक्स सेन्सेस बरवारा फोर्ट हॉटेलमध्ये सात फेरे घेतील. चौथ का बरवरा येथे वसलेला हा किल्ला १४ व्या शतकात बांधला गेला आणि ८०० वर्षे जुना आहे. किल्ल्याचे रूपांतर अलीकडे आलिशान हॉटेलमध्ये झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी रॉयल वेडिंगसाठी हे हॉटेल निवडले आहे. 7 ते 12 डिसेंबर दरम्यान विवाह सोहळा चालणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या