Home /News /entertainment /

विकीने कतरिना नाही तर 'या' कैफसाठी लिहिला खास मेसेज, स्पेशल फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा

विकीने कतरिना नाही तर 'या' कैफसाठी लिहिला खास मेसेज, स्पेशल फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) नुकताच अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर विकी कौशल कतरिना आणि तिच्या कुटुंबावर मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करत आहे.

    मुंबई, 6 जानेवारी-   बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेता विकी कौशलने   (Vicky Kaushal)  नुकताच अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर विकी कौशल कतरिना आणि तिच्या कुटुंबावर मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करत आहे. नुकताच विकी कौशलने कतरिनाची बहीण  (Katrina Kaif Sister)  म्हणेजच आपल्या मेहुणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इसाबेलचा सुंदर फोटो शेअर करत विकीने शुभेच्छा दिल्या आहेत. काही वेळेपूर्वी विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्यानं आपल्या लाडक्या मेहुणीचा अर्थातच अभिनेत्री इसाबेल कैफचा फोटो शेअर केला आहे. आज इसाबेलचा वाढदिवस आहे. त्यामुळे फोटो शेअर करत विकीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. विकीने इसाबेलला शुभेच्छा देत म्हटलं आहे. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा इसी... आजचा दिवस कामासाठीच आणि पार्टीसाठी उत्तम आहे'. या पोस्टमधून विकीच आणि त्याच्या मेहुणीच उत्तम बॉन्डिंग दिसून येत आहे. विकी कतरिनाच्या कुटुंबाचा फारच आदर करतो. कतरिनाच्या एका जवळच्या फ्रेंडने खुलासा करत म्हटलं होतं, की 'कतरिनाने लग्नापूर्वी विकीसमोर एक अट ठेवली होती. यावेळी कतरिनाने अट ठेवत विकीला म्हटलं होतं, लग्नानंतर तुला माझ्या कुटुंबाला स्वतःच्या कुटुंबा इतकंच प्रेम आणि आदर द्यावा लागेल. ही अट मंजूर असेल. तरच मी लग्न करेन. विकीने क्षणार्धात ही अट मान्य केली होती. त्यांनतर या दोघांनी लग्न केलं. कतरिना आणि विकीने राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडामध्ये राजेशाही थाटात लग्न सोहळा उरकला आहे. लग्नानंतर त्यांनी सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. विकी आणि कतरिनाच्या लग्नामध्ये कतरिनाच्या बहिणीसुद्धा फारच सुंदर दिसत होत्या. त्यांनी नवरीच्या बहिणी म्हणून सर्व चालीरीती पार पाडल्या आहेत. शिवाय कतरिनाने आपल्या लग्नातीळ सुंदर फोटो शेअर करत आपल्या बहिणींसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. यामध्ये कतरिनाने आपल्या बहिणींना आपली ताकत आणि आपला आधारस्तंभ म्हटलं होत. कतरिनाच्या बहिणींना तिच्या लग्नामध्ये पेस्टल कलरचे सुंदर लेहेंगे परिधान केले होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या