मुंबई, 1 डिसेंबर : अभिनेता विक्की कौशलच्या आगामी 'सॅम बहादुर' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात आहेत. अखेर सॅम बहादुर सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. सिनेमाची पहिली झलक दाखवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्याचप्रमाणे सिनेमाची युनिक रिलीज डेटही समोर आली आहे. विक्की कौशल प्रमुख भूमिकेत असलेला सॅम बहादुर हा सिनेमा आजपासून 365 दिवसांनी रिलीज होणार आहे. सिनेमाच्या छोट्याशा टीझरनं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. टीझरमध्ये विक्की कौशल भारतीय सैनिकांच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच्या भोवती इतर भारतीय जवान दिसत आहेत. तर टीझरच्या बॅकग्राऊंडला देशभक्तीपर संगीत ऐकायला मिळत आहे.
अभिनेता विक्की कौशलनं टीझरची अनाऊंसमेंट करत स्वत: टीझर शेअर केला आहे. सॅम बहादुर हा सिनेमा आजच्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबर 2023मध्ये रिलीज होणार आहे. विक्की कौशलनं टीझर शेअर करत म्हटलंय, '365 दिवस राहिलेत. 1 डिसेंबर 2023मध्ये सॅम बाहदुर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे'. सिनेमाच्या रिलीजची खूप चर्चा झाली होती. हा सिनेमा मानेक शॉ यांच्या रिअल लाइफवर आधारित असून सिनेमातून त्यांच्या संपूर्ण प्रवास उलगडण्यात येणार आहे. सत्य घटनेवर आधारित या सिनेमात विक्की कौशल स्वत:ला सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा - शारीरिक छळ, शिवीगाळ, धमकी आणि मारहाण; बिग बॉसच्या गोल्डन बॉयवर पत्नीनं केलेत गंभीर आरोप
View this post on Instagram
अभिनेता विक्की कौशल मॅन मानेकशॉ यांच्या मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री सान्या मल्होत्रा मानेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री फातिमा सना शेख माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं स्क्रिप्टींग गुलजार, भवनी अय्यर आणि शांतनु श्रीवास्वत यांनी केलं आहे. तर सिनेमाला म्युझिक शंकर एहसान लॉय यांनी दिलं आहे. विक्की कौशल आणि मेघना गुलजार यांचा हा एकत्र दुसरा सिनेमा आहे.
4 दशकांमध्ये 5 युद्धांमध्ये सॅम मानेकशॉ यांची कारकिर्द दाखवण्यात येणार आहे. सॅम मानेकशॉ हे फिल्ड मार्शल पदावर स्थानापन्न होणारे पहिले भारतीय सेना अधिकारी होते. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांची सेना जिंकल्यानं बांग्लादेश निर्माण झाला. सिनेमाची रिलीज डेट तर समोर आली आहे मात्र आणखी एक वर्षभर प्रेक्षकांना सिनेमाची वाट पाहावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.