• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sardar Udham साकारताना अशी झाली Vicky Kaushal ची अवस्था, ओळखणंही होतंय कठीण

Sardar Udham साकारताना अशी झाली Vicky Kaushal ची अवस्था, ओळखणंही होतंय कठीण

अभिनेता विकी कौशल सध्या 'सरदार उधम' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 16 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर (Sardar Udham On Amazon Prime) वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो विकीने शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 07 ऑक्टोबर: अभिनेता विकी कौशल सध्या 'सरदार उधम' (Vicky Kaushal Starr Sardar Udham) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 16 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर (Sardar Udham On Amazon Prime) वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि टीझरने प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली आहे. यामध्ये सरदार उधम सिंग यांच्या भूमिकेत विकी दिसणार आहे, त्याने या भूमिकेकरता घेतलेल्या मेहनतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. विकीच्या चाहत्यांना या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि सिनेमाच्या टीमने 'सरदार उधम'च्या सेटवरील विविध फोटो शेअर केले आहेत. मात्र विकीने शेअर केलेला लेटेस्ट फोटो लक्ष वेधून घेणारा आहे. यामध्ये विकीचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलला आहे. या भूमिकेला साजेसा मेकअप, केसांची ठेवण, हावभाव यामध्ये विशेष बदल असल्याने विकी कौशलला ओळखणंही कठीण झालं आहे. विकीने हा फोटो शेअर करताना कोणत्या प्रसंगावेळचा हा फोटो आहे हे देखील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. वाचा-विकी कौशल बनणार साराचा पती! रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार ही जोडी हा फोटो शेअर करताना विकीने लिहिलं आहे की, '1931, तुरुंग, भारत. प्रतिबंधित कागदपत्रांचा "गदर-ए-गुंज" (Voice of Revolt) ताबा मिळवल्याने उधम सिंग तुरुंगात होते. नंतर त्यांची सूटका करण्यात आली पण त्यांच्यावर सतत पाळत होती. लवकरच, ते युरोपला पळून गेले आणि त्यांना भारतात परतण्याची संधी मिळाली नाही.'
  विकी कौशलच्या या सिनेमाचं दिग्दर्शन सुजीत सरकार यांनी केलं असून रॉनी लेहरी आणि शील कुमार यांची निर्मिती असणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात शहीद भगत सिंग यांची भूमिका अभिनेता अमोल पराशर साकारणार आहे.
  'सरदार उधम'च्या सेटवरील विकी आणि अमोलचा हा फोटो देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. सरदार उधम सिंग यांच्या या जीवनपटात ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकणाऱ्या आणि देशवासीयांच्या मृत्यूचा बदला (जालियनवाला बाग हत्याकांड) घेण्याच्या त्यांच्या शौर्याचा इतिहास अनुभवता येणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: