Home /News /entertainment /

कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल; VIRAL VIDEO मुळे लग्नाच्या चर्चेला जोर

कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल; VIRAL VIDEO मुळे लग्नाच्या चर्चेला जोर

विकी कौशलसोबतच्या (Vicky Kaushal) लग्नाच्या बातम्यांदरम्यान कतरिना कैफ (Katrina Kaif) काल वांद्रे येथे स्पॉट झाली. यादरम्यान तिने आपला चेहरा मास्कने झाकलेला होता. आणि ती पापाराझींना टाळण्याचा प्रयत्न करताना दिसली. आता नुकताच कतरिना कैफच्या घराबाहेर विकी कौशलला स्पॉट करण्यात आलं आहे

पुढे वाचा ...
  मुंबई, 4 डिसेंबर-  विकी कौशलसोबतच्या   (Vicky Kaushal)  लग्नाच्या बातम्यांदरम्यान कतरिना कैफ   (Katrina Kaif)  काल वांद्रे येथे स्पॉट झाली. यादरम्यान तिने आपला चेहरा मास्कने झाकलेला होता. आणि ती पापाराझींना टाळण्याचा प्रयत्न करताना दिसली. आता नुकताच कतरिना कैफच्या घराबाहेर विकी कौशलला  स्पॉट करण्यात आलं आहे. जेव्हा अभिनेता कतरिनाच्या घरी पोहोचला आणि पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले तेव्हा तिने आनंदाने हात हलवून मीडियाला प्रतिसाद दिला. लग्नाच्या बातम्यांदरम्यान, विकी कौशल कतरिनाच्या घरी पोहोचल्याने त्याच्या लग्नाच्या बातम्यांना अधिक हवा मिळत आहे. कारण, याआधी विकी जेव्हा-जेव्हा त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचायचा तेव्हा तो मीडियापासून डोळे लपवताना दिसायचा. पण, यावेळी तो उघडपणे आपला आनंद व्यक्त करताना दिसला.शुक्रवारी संध्याकाळी विकी कतरिनाच्या घराबाहेर दिसला. यादरम्यान तो कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने निळ्या रंगाचा स्वेटशर्ट, निळा डेनिम आणि तपकिरी टोपी घातली होती. तसेच मास्क लावला होता. गाडीतून खाली उतरल्यावर पापाराझींनी आवाज दिला आणि मीडियाला मन न दुखावता त्याने मोकळेपणाने पोझही दिली.
  आदल्या दिवशी संध्याकाळी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ कतरिनाच्या घरी जाताना दिसली. कतरिनाला अनेक वेळा स्टाइल केलेली अनिता कतरिनाच्या वांद्रे येथील घरी पोहोचताना दिसली. फोटोंसाठी कतरिनाच्या घराबाहेर वाट पाहत असलेल्या फोटोग्राफर्सनी संध्याकाळच्या वेळी  सेलिब्रिटी स्टायलिस्टला कॅप्चर केले जी  पुढील आठवड्यात होणाऱ्या कथित लग्नाचा भाग असू शकते.  कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, आतापर्यंत दोन्ही स्टार्सनी या प्रकरणावर मौन पाळले आहे. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुमर्ड सेलिब्रिटी कपल 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्न करणार आहे. आज दोघांच्या कोर्ट मॅरेजची चर्चा सुरू आहे. तसेच या जोडप्याच्या कोर्ट मॅरेजच्या बातम्यांदरम्यान, त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये कतरिना कैफ पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. हिडिओमध्ये कतरिनाने काळ्या रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला आहे. पार्श्वभूमीत छान संगीत वाजत आहे. व्हिडिओमध्ये नेटिझन्स कतरिनाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. पिंकविलाने जवळच्या स्त्रोताचा हवाला देत सांगितले की, “कतरिना आणि विकी आज किंवा उद्या मुंबईत कोर्ट मॅरेजसाठी जाणार आहेत. ज्यात जोडप्याच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित असतील. जर त्यांनी लग्न केले तर ते स्पेशल मॅरिज, 1954 अंतर्गत असेल. विवाह निबंधकाच्या उपस्थितीत जोडप्याचे तीन साक्षीदार घोषणापत्रावर स्वाक्षरी करतील.तसेच कोर्ट मॅरेजनंतर ते वीकेंडला मित्र आणि नातेवाईकांसह राजस्थानला जातील.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या