VIDEO : सलमानसमोर कतरिनाला कोणी केलं प्रपोज?

VIDEO : सलमानसमोर कतरिनाला कोणी केलं प्रपोज?

कॉफी विथ करण कार्यक्रमात कतरिनाने विकी कौशलसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता विकीने सलमान खानसमोर कतरिनाला प्रपोज केलं आहे. यावर सलमानची रिअॅक्शन काय होती पाहा.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी : अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या अफेअरची चर्चा याआधी बऱ्याचदा झाली आहे. पण सलमान आणि कतरिना यांच्यामध्ये रणबीर कपूर आल्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी' सुरू झाली. पण रणबीर-कतरिनाचं रिलेशन जास्त काळ टिकलं नाही. यानंतर रणबीर-दीपिकाच्या रिलेशनबद्दल कतरिनाला समजल्यावर तिने पुन्हा सलमानकडे धाव घेतली. पण आता असं काही घडलं आहे की ज्यामुळे सलमानच्या चेहऱ्याचा रंग बदलला आहे.

नुकताच कतरिना कैफ कॉफी विथ करण शोमध्ये आली होती. त्यावेळी करणने कतरिनाला सध्या कोणत्या नवीन कलाकारासोबत काम करायला आवडेल असा प्रश्न विचारला. तेव्हा तिने विकी कौशल असं नावं घेतलं होतं. यानंतर करणने विकीला याच कार्यक्रमात कतरिनाच्या या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं, तेव्हा कतरिना मला ओळखते असा प्रश्न विकीला पडला.

एका अॅवॉर्ड कार्यक्रमात  कतरिना आणि विकी समोरासमोर आले. तेव्हा विकी कौशलला ही संधी गमवायची नव्हती. म्हणून त्यानं सलमान खानसमोर कतरिनाला लग्नासाठी प्रपोज केलं. प्रपोज केल्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये विकी म्हणतो की, सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे आणि जर तुला लग्न करायचं असेल तर माझ्यासोबत लग्न करू शकते. सलमानच्या सिनेमातील मुझसे शादी करोगी गाणं गात त्यानं फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं. यावर कतरिनाला नक्की काय उत्तर द्यावं हे कळत नसल्यामुळे 'माझ्यात हिंमत नाही' असं उत्तर देते. सलमान खानला हे उत्तर अपेक्षित नसल्याने त्याने यावर दिलेली रिअॅक्शन गमतीशीर आहे.

 

 

View this post on Instagram

 

😍👌 . . . #instabolly #bollyinsta

A post shared by Bollywood💎725k🙏 (@bollylnsta) on

VIDEO फरहानच्या मुलींनी शिबानीला 'छोटी माँ' म्हणून स्वीकारलं?

First published: January 5, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading