• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Vicky Kaushal- Katrina Kaif यांच्यात कोणाची कमाई सर्वाधिक, वाचा In Details

Vicky Kaushal- Katrina Kaif यांच्यात कोणाची कमाई सर्वाधिक, वाचा In Details

कधी काळी पन्नास हजार रुपये कमावणारे हे दोन्ही स्टार आता कोट्यवधी रुपयांची कमाई (Earnings) करत आहेत.

  • Share this:
मुंबई, 19 नोव्हेंबर:  गेल्या काही दिवसांपासून 'बी टाउन'मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाबाबत (Marriage) जोरदार चर्चा सुरू आहेत. दिग्दर्शक कबीर खानच्या घरी विकी आणि कतरीनाची 'रोका सेरेमनी' पार पडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. येत्या डिसेंबरमध्ये (2021) दोघे राजस्थानमधल्या जोधपूर शहरातल्या 'सिक्स सेन्सेस फोर्ट'मध्ये (Six Senses Fort) लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ही बातमी कितपत खरी आहे, हे येणाऱ्या काळात कळेलच. दरम्यान, आता विकी आणि कतरिना आपापल्या कामांमधून किती कमाई करतात याबाबतच्या चर्चा रंगत आहेत. दोघेही सध्या आपल्या करिअरच्या चांगल्या टप्प्यात असून, दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेमध्ये भर पडत आहे. कधी काळी पन्नास हजार रुपये कमावणारे हे दोन्ही स्टार आता कोट्यवधी रुपयांची कमाई (Earnings) करत आहेत. 'आज तक'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. करिअरचा विचार केल्यास कतरिनानं विकीच्या अगोदर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यामुळे कामाच्या बाबतीत तिला विकीपेक्षा जास्त अनुभव आहे. सध्या बॉलिवुडमधल्या A लिस्ट अ‍ॅक्ट्रेसेसमध्ये कॅटची गणना होते. एका न्यूज साइटने दिलेल्या वृत्तानुसार एका चित्रपटासाठी कतरिना 11 कोटी रुपये मानधन घेते. कतरिनाच्या तुलनेत विकी कौशल इंडस्ट्रीमध्ये नवखा असला, तरी त्याची कमाईदेखील कोट्यवधीच्या घरात आहे. विकीच्या करिअरची गाडी जोरात धावते आहे. तो एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो. हेही वाचा-  'Indian Idol Marathi'च्या मंचावर घुमला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आवाज; ऑडिशनने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
 चित्रपटांव्यतिरिक्त कतरिना ब्रँड एन्डॉर्समेंटमधूनही (Brand endorsement) भरपूर कमाई करते. स्लाइस, नक्षत्र, लक्स, पॅनासोनिक, लॅक्मे आणि लॉरियल यांसारख्या मोठ्या ब्रँडसाठी ती काम करते. नायकासारख्या (Nykaa) प्रसिद्ध आणि यशस्वी फॅशन ब्रँडची ती गुंतवणूकदारदेखील आहे. सध्या नायकाचा भारतात बराच बोलबाला आहे. याशिवाय, कतरिनाचा 'Kay' नावाचा एक ब्युटी ब्रँड आहे. या ब्रँडची प्रॉडक्ट्स 'नायका'वर उपलब्ध आहेत.
हेही वाचा-  फक्त सौंदर्यच नव्हे तर सुष्मिता सेनच्या फिटनेसचीही होते चर्चा! पाहा अभिनेत्रीचा 'Fitness Mantra'
इकॉनॉमिक टाइम्सने तिला 2012मधला 'सेकंड मोस्ट प्रॉम‍िनन्ट एन्डॉर्सर' हा किताब दिला होता. हिंदुस्तान टाइम्सच्या 2014मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, कतरिनाला एका ब्रँड एंडॉर्समेंटसाठी 50 ते 60 दशलक्ष रुपये मिळाले होते. तेव्हापासून सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तिचा समावेश झाला. कतरिनाची सर्व कमाई मोजली तर वर्षभरात ती सुमारे 224 कोटी रुपये मिळवते.
कतरिनाप्रमाणं विकी कौशलदेखील अनेक ब्रँड्ससाठी काम करतो आहे. चित्रपट आणि ब्रँड एन्डॉर्समेंट मिळून विकीची अ‍ॅन्युअल नेट वर्थ 25 कोटी रुपये होते. सध्या कतरिना कमाईच्या बाबतीत विकीच्या पुढे आहे; पण विकीची सध्याची घोडदौड पाहता लवकरच तो कतरिनाची बरोबरी करेल यात शंका नाही. हेही वाचा-  VIDEO: कार्तिक आर्यननं लाजत सांगितलं आपलं रिलेशनशिप स्टेट्स; ऐकताच कपिल शर्माला आलं हसू
 समोर येत असलेल्या लग्नाच्या बातम्या खऱ्या ठरल्या, तर विकी कौशल आणि कतरिना कैफ हे इंडस्ट्रीतलं पॉवर कपल ठरू शकतं.
Published by:Pooja Vichare
First published: