• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • विकी कौशलच्या आईनं कतरिनासाठी पाठवली दिवाळीची भेट? या खास वस्तूंचा होता समावेश

विकी कौशलच्या आईनं कतरिनासाठी पाठवली दिवाळीची भेट? या खास वस्तूंचा होता समावेश

कतरिना कैफसोबत अफेअरवर Vicky Kaushal ने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला...

कतरिना कैफसोबत अफेअरवर Vicky Kaushal ने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला...

कतरिना कैफसाठी (Katrina Kaif) ही दिवाळी (Diwali 2021) खूप खास आहे. ती विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. याशिवाय तिचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 6 नोव्हेंबर-  कतरिना कैफसाठी  (Katrina Kaif)  ही दिवाळी  (Diwali 2021) खूप खास आहे. ती विकी कौशलसोबत (Vicky Kaushal)  लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. याशिवाय तिचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. कतरिनासाठी ही दिवाळी नक्कीच आनंद घेऊन आली आहे. विशेष म्हणजे विक्की कौशलची आई वीणा कौशलने दिवाळीला अभिनेत्रीला शगुन पाठवला असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ डिसेंबरमध्ये या अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीसोबतच एकमेकांशी संवाद वाढवत आहेत. विकीची आई वीणा कौशलने दिवाळीला कतरिनासाठी हाताने बनवलेला शगुन पाठवला होता. बॉलिवूडलाइफने एका सूत्राच्या माहितीनुसार सांगितलं की, अभिनेत्याच्या आईने कतरिनासाठी काही खास गोष्टी पाठवल्या आहेत.शगुन म्हणून पाठवलेल्या या गोष्टींमध्ये हाताने तयार केलेली चॉकलेट्स आहेत. जी कतरिनाला खूप आवडतात. मिठाई आणि नमकीन सोबतच काही साड्या आणि दागिनेदेखील आहेत. भारतीय परंपरेनुसार, जेव्हा लग्न निश्चित केले जाते, तेव्हा जावई किंवा सून यांना पहिल्या दिवाळीला असं शगुन पाठवलं जातं. लॉकडाऊनमध्ये विकी आणि कतरिना एकमेकांच्या जवळ आले होते. इंडिया टुडेने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होतं की, जेव्हा विकीने कतरिनाला प्रपोज केल तेव्हा अभिनेत्याने कतरिनाला डार्क चॉकलेट दिले होते. विकी हा खूप रोमँटिक स्वभावाचा असल्याचं म्हटलं जात आहे. कतरिनाला तिच्या लग्नात एखाद्या राणीसारखं दिसायचं असल्याच्या बातम्या येत आहेत. तिला राजस्थानची संस्कृती फार आवडते. त्यामुळे ती पारंपारिक शैलीत कपडे परिधान करणार आहे. या जोडप्याच्या जवळच्या लोकांना चांगलंच कळलं आहे की दोघेही एकमेकांसाठी वेडे झाले आहेत. कतरिनाचा गोड स्वभाव विकीला खूप आवडत असल्याचंदेखील म्हटलं जातं. (हे वाचा:कतरिना-विकी करतायेत लग्नाची तयारी? 'या'ठिकाणी दिसले एकत्र, जाणून घ्या ... ) ETimes ने एका जवळच्या स्त्रोताचा हवाला देत सांगितलं की, तिच्या लग्नाचा ड्रेस सब्यसाची डिझाइन करत आहे. सध्या ती तिचा ड्रेस निवडण्याच्या प्रक्रियेत आहे. कतरिनाने तिच्या ड्रेससाठी सिल्कची निवड केली आहे. नुकताच कतरिना कैफ आणि विकी कौशल रेश्मा शेट्टीच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाले होते. दोघेही आपापल्या कारमधून तिथे पोहोचले होते.विरल भयानीने हि पोस्ट शेअर केली होती. कतरिना कैफ विकी कौशलला डेट करत असल्याच्या अफवा 2018 मध्ये सुरू झाल्या होत्या. 'कॉफी विथ करण' या प्रसिद्ध चॅट शोच्या सीझन 6 मध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत रुपेरी पडद्यावर चांगली दिसणार असल्याचं उघडपणे सांगितलं होतं.कतरिना कैफ 'टायगर 3' च्या शूटसाठी निघण्यापूर्वी या जोडप्याच्या रोका सेरेमनीच्या बातमीने चाहत्यांना आनंद झाला होता. तथापि, कतरिनाच्या टीमने पुष्टी केली की या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
  Published by:Aiman Desai
  First published: