Home /News /entertainment /

Wedding update: विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाची लगबग सुरू, 'हे' सेलेब्स लावणार हजेरी

Wedding update: विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाची लगबग सुरू, 'हे' सेलेब्स लावणार हजेरी

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding update

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding update

विकी कौशल आणि कतरीना कैफ येत्या (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding update) डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.

    नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत अजूनही अनेक बातम्या येत आहेत. रोज काहीना काही नव्या अपडेट येत असतात. आताही एक नवीन अपडेट आली आहे. रिपोर्ट्सनुसार या लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. मात्र, या यादीमध्ये सलमान-शाहरुख या जवळच्याच व्यक्तींची नावे वगळले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विकी कौशल आणि कतरीना कैफ येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरीना आणि विकी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील Six Senses Fort Barwara या र रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला येणार्‍या पाहुण्यांच्या नावाची चर्चाही रंगली आहे. या लग्नात जवळपास 200 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या लग्नाच्या संगीत सेरेमनी आणि मेहंदी सोहळ्याशी संबंधित अनेक बातम्या चर्चेत येत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, बॉलिवूड दिग्दर्शक शशांक खेतान, जोया अख्तर, प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान, ही कलाकार मंडळींना विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचं आमंत्रण आलं आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडचा किंग खान आणि भाईजान सलमान खान यांना अजुनही त्यांच्या लग्नाचे आमंत्रण मिळालेले नाही. खरतंर कतरिनाने बहुतांश चित्रपटांमध्ये या दोघांसोबत झळकली आहे. त्यामुळे त्या दोघांनाच अद्याप निमंत्रण नसल्याने चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ई टाइम्सच्या वृत्तानुसार या दोघांचे लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. लग्नासाठी कतरीना कैफचे ड्रेस प्रसिद्ध ड्रेस डिझाईनर सब्यासाची करत आहे. अर्थात या लग्नाच्या वृत्ताबद्दल दोघांनी अथवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal, Wedding

    पुढील बातम्या