नवी दिल्ली : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबर 21ला लग्नबंधनात अडकले. या दोघांच्या आयुष्यात सध्या काय चालले आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी चाहते ( Fans ) आतुर असतात. तुम्हाला माहिती आहे का, विकी आणि कतरिना हे दोघे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohali) यांचे शेजारी बनले आहेत. एनडीटीव्ही ने याबाबत वृत्त दिलंय.
विकीसोबत लग्न करणारी कतरिना त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झालीय. रविवारी सकाळी दोघेही त्यांच्या जुहूतील घरी पोहोचले. विकीचे वडील शाम कौशल आणि आई वीणा कौशल देखील यावेळी सोबत होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिनाची कार बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये शिरताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'काल रात्री कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या नवीन घरात आले आणि सकाळी 8 वाजता त्यांच्या नवीन घराची पूजा केली गेली. जवळचे कौटुंबिक मित्रही यात सामील झाले होते.'
काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर विकी आणि कतरिना या दोघांनी नुकतेच लग्न केले. दोघांनीही आपलं नातं मीडियापासून दूर ठेवलं होतं. त्यांचा तीन दिवसांचा विवाह सोहळा अतिशय खासगी ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अखेर दोघांनी लग्न करीत त्यांचे नातं जगजाहीर केले. त्यांनी लिहिले की, 'आमच्या हृदयात त्या सर्व गोष्टींबद्दल फक्त प्रेम आणि आदर आहे, ज्याने आम्हाला या क्षणापर्यंत आणले आहे. आमचा नवा प्रवास एकत्र सुरू करताना तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.'
लग्नानंतर आता विकी व कतरिना यांनी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली राहत असलेल्या इमारतीत नवीन घर घेतलय. विकी व कतरिनाचे अभिनंदन करताना अनुष्का शर्माने, 'दोन्ही ब्युटीफूल लोकांचे अभिनंदन,' अशा शुभेच्छा दिल्या होत्या. 'तुम्हा दोघांनाही आयुष्यभर एकमेकांची साथ, प्रेम आणि समजूतदारपणा लाभो. मला आनंद आहे की, तुझं शेवटी लग्न झालं आहे आणि तू तुझ्या नवीन घरात प्रवेश केल्यावर आता आम्हाला कन्स्ट्रक्शनचा आवाज ऐकावा लागणार नाही,' असेही अनुष्काने म्हटलं होतं.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. हे दोघे 9 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकले. या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अजूनही या दोघांच्या आयुष्यात काय चालले आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.