Home /News /entertainment /

Vicky Kaushal-Katrina Kaif लग्नानंतर कुठं कुठं जाणार हनीमूनला; प्लॅन ऐकून लावाल डोक्याला हात

Vicky Kaushal-Katrina Kaif लग्नानंतर कुठं कुठं जाणार हनीमूनला; प्लॅन ऐकून लावाल डोक्याला हात

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. लग्नानंतर ही जोडी हनीमूनला कुठं जाणार असा प्रश्न पडला होता. याबद्दल एक माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. या दोघांचा रोका झाल्याचाही दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यानंतर आता एक नवीन माहिती समोर आली आहे. लग्नानंतर विकी आणि कतरिना हनीमूनला कुठं जाणार असा प्रश्न पडला होता. मात्र विकी आणि कतरिना हनीमूनला जाणार नाहीत कारण ते दोघेही कामातून ब्रेक घेणार नाहीत. त्यांचे आगामी प्रोजेक्ट्स पूर्ण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बॉलीवूड लाइफने आपल्या रिपोर्टमध्ये एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, विकी-कतरिनाने अद्याप कुणाला लग्नाचे आमंत्रण पाठवलेले नाही. दोघांच्या जवळच्या मित्रांना त्यांच्या लग्नाची संपूर्ण माहिती आहे. कतरिना अशा लोकांपैकी नाही जी लपूनछपून एकादी गोष्ट करेल. लवकरच कतरिना कैफ तिच्या लग्नाची घोषणा करू शकते. लग्नानंतर हे जोडपे ब्रेक घेणार नाहीत. वाचा : विकी-कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची अशी प्रतिक्रिया..... रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या कामाल पहिलं महत्त्व देतात. त्यांचा चित्रपट वेळेत पूर्ण व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाणार नाहीत. दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर परतणार आहेत. कतरिना कैफला टायगर 3 चे शूटिंग पूर्ण करायचे आहे. यानंतर ती श्रीराम राघवन यांच्या अनटाइटल्ड चित्रपटात काम करणार आहे. कतरिना कैफ लग्नानंतर दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगवर परतणार आहे. दुसरीकडे, विकी कौशलला सॅम बहादूरच्या शूटिंगवर परतावे लागणार आहे. वाचा :तुम्ही पाहिलाय का सुपरस्टार Rajinikanth यांचं घर? Inside Photo आले समोर कतरिना-विकीकडे 15 दिवस आहेत. त्यापैकी 3-4 दिवस त्यांच्या लग्नसमारंभ तसेत लग्नाआधीच्या कार्यक्रमासंबंधी लागणार आहेत. उरलेल्या दिवसांत दोघांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. लग्नानंतर ते नवीन घरात स्थायिक होतील. दोघेही त्यांच्या नवीन घराबद्दल उत्सुक आहेत. यानंतर ही जोडी हनिमूनला जाणार आहे. सध्या दोघांचेही प्राधान्य शूटिंग पूर्ण करण्याला आहे. कतरिनाच्या लग्नामुळे सलमान खानने टायगर 3 चे शूट स्थगित केले आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Katrina kaif

    पुढील बातम्या