मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘मित्रा तू गाढव नाहीस’; विक्की कौशलचा स्टंट पाहून सेलिब्रिटींनी उडवली खिल्ली

‘मित्रा तू गाढव नाहीस’; विक्की कौशलचा स्टंट पाहून सेलिब्रिटींनी उडवली खिल्ली

विक्कीनं घोड्यावर उभं राहून स्वत:चं फोटोशूट केलं आहे. यातील एक फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला. “आज सकाळी मजनुभाईंच्या पेंटिंगनं मी प्रेरित झालो अन् हा फोटो काढला.”

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 12 मार्च: सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike) या चित्रपटामुळं लोकप्रिय झालेला विक्की कौशल (Vicky Kaushal) हा बॉलिवूडमधील सध्याचा आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. विक्की चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी विक्की चक्क एका घोड्यामुळं चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याच्या या फोटोची तुलना वेलकम चित्रपटातील मजनुभाईनं काढलेल्या चित्राशी केली जात आहे. (majnu bhai painting)

विक्कीनं घोड्यावर उभं राहून स्वत:चं फोटोशूट केलं आहे. यातील एक फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला. “आज सकाळी मजनुभाईंच्या पेंटिंगनं मी प्रेरित झालो अन् हा फोटो काढला.” अशा आशयाची गंमतीशीर कॉमेंट देखील त्यानं या फोटोवर केली आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच टायगर श्रॉफ, कियारा आडवाणी, दिशा पटानी यांसारख्या अनेर सेलिब्रिटींनी देखील या फोटोवरुन विक्कीची खिल्ली उडवली आहे.

अवश्य पाहा - Birthday Special: भविष्यवाणी ठरली खरी; या शोमुळं बदललं श्रेया घोषालचं आयुष्य

2007 साली प्रदर्शित झालेल्या वेलकम या विनोदी चित्रपटात अनिल कपूर यांनी मजनुभाई ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मजनुभाईला चित्रकलेची प्रचंड आवड असते. दरम्यान त्यानं घोड्यावर बसलेल्या एका गाढवाचं चित्र काढलं होतं. हे चित्र पाहून विक्की प्रेरित झाला अन् त्याने घोड्यावर उभं राहून स्वत:चं फोटोशूट केलं असा दावा केला आहे. या दोन्ही फोटोंची सध्या सोशल मीडियावर तुलना केली जात आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Vicky kaushal