Home /News /entertainment /

विकी कौशलने शेअर केला जबरदस्त डान्स VIDEO; युजर्स म्हणाले 'कतरिना वहिनी...'

विकी कौशलने शेअर केला जबरदस्त डान्स VIDEO; युजर्स म्हणाले 'कतरिना वहिनी...'

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आपल्या लग्नामुळे सतत चर्चेत असतात. कतरिना आणि विकीने 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती.

  मुंबई, 11 जानेवारी-  बॉलिवूड    (Bollywood)  अभिनेता विकी कौशल   (Vicky Kaushal)   आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)   आपल्या लग्नामुळे सतत चर्चेत असतात. कतरिना आणि विकीने 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. त्यांनतर ते सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून आपलं एकेमकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. आजही अभिनेता विकी कौशलने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ   (Viral Vedio)  शेअर केला आहे. यामध्ये तो आनंदाने डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत. अभिनेता विकी कौशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या पोस्टला मोठ्या प्रमाणत पसंत केलं जातं. तसेच त्या पोस्ट प्रचंड व्हायरलदेखील होत असतात. अभिनेता विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशल जबरदस्त डान्स मूव्ह्स करताना दिसून येत आहे. त्याचा डान्स पाहून सर्वच घायाळ होत आहेत. अभिनेत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. चाहते लाईक्स नि कमेंट्स करून विकीच्या या व्हिडिओला प्रेम देत आहेत. तसेच काही युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट् करत म्हटलं आहे, 'वहिनी (कतरिना कैफ) व्हिडीओ बनवत आहे का?' तर दुसऱ्याने लिहिलं आहे, 'कतरिनासोबत लग्न झाल्यावर माणूस असाच नाचणार'. तर आणखी एकाने लिहिलं आहे, जेव्हा आपल्याला माहिती असतं आपल्याला चांगली बायको नाही मिळणार आणि अचानक कतरिना कैफ भेटते तेव्हा असाच डान्स निघतो'.आणखी दुसऱ्याने लिहिलं, 'जेव्हा वहिनी बोलते लवकर घरी या'. तर एका युजरने लिहिलं , 'जेव्हा तुम्हाला समजत तुम्ही कतरिना कैफचे पती आहात'. अशाप्रकारे युजर्स प्रचंड मजेशीर कमेंट्स देत आहेत. विकीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
  नुकताच कतरिना आणि विकीच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. या दोघांनी गेल्या महिन्यात 9 डिसेंबरला लग्न केलं होतं. लग्नानंतरही हे दोघे सतत चर्चेत आहेत. लग्नानंतर कतरिना आणि विकी सतत आपले रोमँटिक फोटो शेअर करत आहेत. चाहते त्यांचे फोटो पाहण्यासाठी फारच उत्सुक असतात. नुकताच कतरिनाने विकीसोबतच एक रोमँटिक फोटो शेअर करत लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.. हा फोटोसुद्धा फारच पसंत करण्यात आला होता. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स दिले होते. लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ आपापल्या कामावर परतले आहेत. सध्या विकी कौशल सारा अली खानसोबत लुका छुपी २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विकी सारासोबत मध्यप्रदेशमधील इंदोरमध्ये शूटिंग करत आहे. या दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा समोर आले होते. चाहते सारा आणि विकीची केमिस्ट्री पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या