Home /News /entertainment /

विकी- कतरिनानं लग्नाला बोलावलं नाही म्हणून नाराज कंडोम कंपनीने लढवली भन्नाट शक्कल...पोस्ट व्हायरल

विकी- कतरिनानं लग्नाला बोलावलं नाही म्हणून नाराज कंडोम कंपनीने लढवली भन्नाट शक्कल...पोस्ट व्हायरल

विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याचे लग्न गोपिनिय ठेवल्याने चर्चेत आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर - विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याचे लग्न गोपिनिय ठेवल्याने चर्चेत आहे. लग्नात पाहुण्यांना मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे. या गुप्त लग्नाची खिल्ली उडवत, एका लोकप्रिय कंडोम ब्रँडने विकी आणि कतरिनासाठी एक मजेदार संदेश शेअर केला आहे, जो पाहून तुम्हीही हसू आवरू शकणार नाही. डुरेक्स कंडोम कंपनीने त्यांच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात लिहिले की, प्रिय विकी आणि कतरिना जर आम्हाला नाही बोलवले तर खरंच ही मस्करी असेल. त्यांच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट येत आहे. या जोडप्याच्या लग्नाला मोजकेच पाहुणे आले आहेत.त्यांच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट येत आहे. या पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते आहे. वाचा : Plane crash मध्ये बर्थडे दिवशीच झाला होता अमिताभ यांच्या को-स्टारचा मृत्यू मेदीं, संगीत आणि हळदी समारंभानंतर, कतरिना कैफ आणि विकी कौशल आज पारंपारिक हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेऱ्यांची वेळ दुपारी साडेतीन वाजता निश्चित करण्यात आली आहे. विकी लग्नात ग्रँड एन्ट्री करणार आहे, तर कतरिना कैफ डोलीत बसून सोहळ्यात पोहोचणार आहे. Live Katrina Kaif marriage today, vicky katrina wedding today, Katrina Kaif mehandi, Katrina Kaif Bride Lehanga , katrina bridal look, विक्की कौशल, कैटरीना कैफ, katrina kaif vicky kaushal news, Katrina Kaif Vicky Kaushal Wedding Photos, Vicky-Katrina Kaif Marriage News LIVE, Katrina-Vicky Wedding Venue Six Senses Fort Barwara, Katrina Kaif and Vicky Kaushal, Katrina Kaif Vicky Kaushal Wedding LIVE coverage या जोडप्याने त्यांच्या शाही विवाहासाठी केवळ 120 पाहुण्यांना आमंत्रित केले आहे, ज्यात नेहा धुपिया, अंगद बेदी, कबीर खान आणि मिनी माथूर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. विवाहस्थळी पोहोचल्यावर, पाहुण्यांना लग्नाबाबत गोपनीयता राखण्याची विनंती एक चिठ्ठी देऊन केले करण्यात आली आहे. या चिठ्ठीत लिहिले आहे की, 'आम्ही तुम्हाला विनंती करतो की, कृपया तुमचे मोबाईल फोन तुमच्या संबंधित रूममध्ये ठेवा आणि कोणत्याही समारंभासाठी आणि कार्यक्रमासाठी फोटो पोस्ट करणे किंवा सोशल मीडियाचा वापर करणे टाळा.' विकी आणि कतरिनाने देखील त्यांच्या पाहुण्यांना गुप्त कोड दिला आहे. वाचा : विकी -कतरिनाच्या लग्नाचा रेड कार्पेट Viral Video पाहून हसून लोटपोट व्हाल! मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर विकी आणि कतरिना लग्झरी रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. ETimes ने एका सूत्राचा हवाला देऊन सांगितले आहे की, हे जोडपे फोर्ट बरवडा येथे त्यांच्या हनिमूनचा आनंद घेतील आणि 12 डिसेंबरपर्यंत तेथे राहतील. त्यानंतर विकी आणि कतरिना त्यांच्या संबंधित चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात करतील.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या