विकी कौशलची 'खास' मैत्रिणीच्या पार्टीला हजेरी; नेटकरी म्हणतात, नजर ना लगें...

विकी कौशलची 'खास' मैत्रिणीच्या पार्टीला हजेरी; नेटकरी म्हणतात, नजर ना लगें...

कतरिना कैफने (Katrina Kaif) तिच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहरने (Karan Johar) हजेरी लावली. पण खरं लक्ष वेधून घेतलं ते विकी कौशलच्या (Vicky Kaushal) उपस्थितीमुळे कारण..

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफने (Katrina Kaif) शुक्रवारी तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी ख्रिसमसची पार्टी (Christmas Bash) आयोजित केली होती. अर्थातच या पार्टीला बॉलिवूडचे एकेक दिग्गज कलावंत उपस्थित होते; मात्र विशेष चर्चा झाली ती विकी कौशलच्या उपस्थितीची. 'उरी' या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आपला भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) सह या पार्टीला आला होता. कतरीना आणि विकी यांच्यात मैत्रीपलीकडे काही असल्याच्या अफवा सध्या पसरल्या आहेत. कतरीनाने या पार्टीला विकीला आवर्जून निमंत्रण दिल्यामुळे त्या चर्चेला अधिक उधाण आलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही (Sidharth Malhotra) या पार्टीत दिसला. नित्या मेहराच्या 'बार बार देखो' या सिनेमात सिद्धार्थ आणि कतरीना यांनी एकत्र काम केलं होतं.

दिग्दर्शक करण जोहरही (Karan Johar) कतरीनाच्या या पार्टीला आला होता. कतरीनाची प्रमुख भूमिका असलेला आणि करण सहनिर्माता असलेला 'सूर्यवंशी' हा सिनेमा रिलीज होण्याच्या बेतात आहे. दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) आपली पत्नी मिनी माथुरसह या पार्टीला आले होते. तसंच, अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी हेदेखील या पार्टीत सहभागी झाल्याचं दिसलं.

विकी कौशल आणि कतरीना कैफ यांच्यात रोमान्स (Romance) सुरू असल्याच्या गप्पा गेल्या काही काळापासून रंगत आहेत. तशा प्रकारचे संकेत त्या दोघांच्या वागण्यातून मिळत असल्याचं सिनेरसिकांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी दिवाळी पार्टीला विकी आणि कतरीना ही जोडी एकत्र दिसली होती. त्यानंतर त्यांच्या रोमान्सबद्दलच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पार्ट्या, डिनर्सच्या वेळी विकी आणि कतरिना ही जोडी एकत्र हजर असल्याचं दिसलं होतं. वेगवेगळ्या सण-उत्सवांचं सेलिब्रेशनही (Celebration) दोघांनी एकत्र केलं होतं.

या वर्षाच्या सुरुवातीला विकी कौशलची भूमिका असलेला 'भूत' हा हॉरर सिनेमा आला होता. त्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी कतरीना कैफ उपस्थित असल्याचं चित्र फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यांनी टिपलं होतं. त्या वेळी तिच्यासोबत तिची बहीण इसाबेल कैफदेखील होती.

त्यानंतर जवळपास वर्षभर कोरोनामुळे कोणत्याच प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम झाले नाहीत. आता ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी कतरीनाने आयोजित केलेल्या पार्टीलाही विकी कौशल आलेला दिसला, तेव्हा त्याचे फोटोग्राफर्सनी टिपलेले फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे विकी आणि कतरीना यांचा रोमान्स सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 26, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या