Home /News /entertainment /

OMG! अंकिताला लग्नाचं जबरदस्त Gift, नवऱ्याकडून कोट्यवधीचा फार्म हाऊस; किंमत ऐकून व्हाल अवाक्

OMG! अंकिताला लग्नाचं जबरदस्त Gift, नवऱ्याकडून कोट्यवधीचा फार्म हाऊस; किंमत ऐकून व्हाल अवाक्

विकीने अंकिताला एक खाजगी व्हिला (फार्म हाऊस)भेट म्हणून दिला आहे. मात्र याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

  मुंबई,16 डिसेंबर-  मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसमारंभाचं वारं वाहात आहे. एका पाठोपाठ एक अनेक कलाकार आपलं लग्न उरकून घेत आहेत. बॉलिवूडमध्ये अनुष्का रंजन, कतरिना कैफ आणि टीव्ही इंडस्ट्रीत श्रद्धा आर्यानंतर आता अंकिता लोखंडेने लग्नगाठ   (Ankita Lokhande Wedding)  बांधली आहे. कतरिना विकी प्रमाणेच अंकिता आणि विकीच्या लग्नाचीसुद्धा सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. लग्नानंतरसुद्धा हे जोडपं चर्चेत आहे. नुकतंच असं समोर आलं आहे, की अंकिता लोखंडेला पती विकी जैनने   (Vicky Jain)   लग्नात कोट्यवधींची भेट दिली आहे. बॉलिवूड लाईफने एका युट्यूब चॅनेलच्या सूत्रांनुसार, सांगितलं आहे, की विकी जैनने अंकिता लोखंडेला या राजेशाही लग्नात कोट्यवधींची भेट दिली आहे. या रिपोर्टनुसार, विकीने अंकिताला एक खाजगी व्हिला (फार्म हाऊस)भेट म्हणून दिला आहे. मात्र याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. या व्हीलची किंमत तब्बल ५० कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विकीने एक खाजगी बोटसुद्धा खरेदी केली आहे. आणि त्याची किंमत ८ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. अंकिता लोखंडे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन हा एक उद्योगपती आहे. तो विलासपूरच्या एका कोळसा उद्योजकाचा मुलगा आहे.त्यामुळे हे लग्न राजेशाही थाटात पार पडणार हे नक्की होतं.
  तसेच अंकिता लोखंडेने इंडस्ट्रीतील आपल्या सहकारी मीट-मैत्रिणींनासुद्धा निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडूनही तिला लाखोंच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिताची खास मैत्रीण आणि निर्माती, दिग्दर्शिका एकता कपूरने अंकिताला लग्नात ५० लाखाची भेट दिल्याचं म्हटलं जात आहे. एकताने अंकिताला पहिला ब्रेक दिला होता. तसेच अंकिताची खास मैत्रीण रश्मी देसाईने तिला एक सुंदर डिझायनर साडी भेट केली आहे, त्याची किंमत १० लाख आहे. ती सध्या बिग बॉसमध्ये असल्याने ती उपस्थित नाही राहू शकली. तसेच अभिनेता रित्विक धनजानीने विकीला ब्रँडेड घड्याळ आणि डायमंड नेकलेस दिलं आहे. अभिनेत्री स्म्रिती झाने अंकिताला ५ लाखाची गोल्ड चेन दिली आहे. तर शाहीर शेखने ५० लाखाचे सोन्याचे दागिने दिले आहेत. तसेच अभिनेत्री मृणालिनी त्यागीने १० लाखाचे सोन्याचे दागिने दिले आहेत. तर माही विजने सब्य साची कलेक्शनमधून सुंदर साडी अंकिताला भेट केली आहे, त्याची किंमत १५ लाख असल्याचं म्हटलं जात आहे. (हे वाचा:अंकिता लोखंडेने विकीसोबत अंगठी शोधताना केलं असं काही, Video Viral ) अभिनेत्री अंकिता लोखंडेचा वेडिंग लूक सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने आपल्या लग्नसाठी गोल्डन कलरचा सीक्वेन्स्ड लेहेंगा निवडला होता. या घेरदार लेहेंग्यामध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत होती. तसेच अंकिताने आपल्या पोशाखाला मॅचिंग असे दागिने घातले होते. अभिनेत्रीने डोक्यावर घेतलेल्या गोल्डन कलरच्या पदराने तिच्या लूकला एक शाही टच दिला होता. अभिनेत्रीने या पोशाखात लग्नमंडपात एन्ट्री करताच सर्वांच्या नजर तिच्यावर खिळल्या होत्या. कारण अंकिता एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. हा खास लेहेंगा प्रसिद्ध सेलेब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी डिझाईन केला होता.सध्या सोशल मीडियावर अंकिताच्या वेडिंग लूकची जोरदार चर्चा होत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ankita lokhande, Entertainment

  पुढील बातम्या