सलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध

का तर, या नावामुळे हिंदूंचा सण नवरात्रीचा अपमान होत असून त्यातून चुकीचा संदेश जात असल्याचा आक्षेप त्यांनी ठेवलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 24, 2018 06:09 PM IST

सलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध

24 मे : संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाला करणी सेनेने केलेला कडवा विरोध आपण सगळ्यांनीच पाहिला. आता एक नवा सिनेमा हिंदू संघटनांच्या रडारवर आहे. आणि हा सिनेमा आहे सलमान खान प्रॅडक्शन्सचा 'लवरात्री'..या सिनेमाच्या नावाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केलाय.

का तर, या नावामुळे हिंदूंचा सण नवरात्रीचा अपमान होत असून त्यातून चुकीचा संदेश जात असल्याचा आक्षेप त्यांनी ठेवलाय. त्यामुळे सिनेमाचं नाव बदललं नाही तर हा सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी पीटीआई या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलाय.

सलमान खानची निर्मिती असलेला लव्हरात्री गुजरातमधली कथा दाखवतो. सिनेमा ५ आॅक्टोबरला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2018 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...