Home /News /entertainment /

ज्येष्ठ समाजसेवक, लेखक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ समाजसेवक, लेखक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट (Dr. Anil Awachat) यांचं आज निधन (Death) झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला.

    मुंबई, 27  जानेवारी-  ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट   (Dr. Anil Awachat)   यांचं आज निधन (Death)  झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. डॉ. अनिल अवचट दोन महिन्यापूर्वी घरामध्ये घसरून पडले होते तेव्हा त्यांच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरू होते दोनच दिवसांपूर्वी त्यांना घरी आणण्यात आलं होतं ते पूर्ण बरे झाले होते मात्र आज सकाळी ते काहीच हालचाल करत नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात आलं त्यांनतर त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं. डॉ. अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूर या गावी झाला होता. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर लिखाण केलं आहे. त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्येसुद्धा आपला सहभाग दर्शवला होता.अवचट यांनी भटक्या जमाती, वेश्या आणि अनेक सामाजिक प्रश्नांवर भरपूर लिखाण केलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या