अमिताभ आणि जया यांची भेट घडवणारे रमेश भाटिया वृद्धाश्रमात !

अमिताभ आणि जया यांची भेट घडवणारे रमेश भाटिया वृद्धाश्रमात !

ज्येष्ठ निर्माते रमेश भाटिया सध्या मेरठच्या एका वृद्धाश्रमात आयुष्य घालवतायत. ते वृद्धाश्रमात स्वता:च्या इच्छेनं नाही तर मजबुरीने राहत आहे.

  • Share this:

13 जानेवारी : ज्येष्ठ निर्माते रमेश भाटिया सध्या मेरठच्या एका वृद्धाश्रमात आयुष्य घालवतायत. ते वृद्धाश्रमात स्वता:च्या इच्छेनं नाही तर मजबुरीने राहत आहे. हो आता त्यांची त्यांच्या घरच्यांपासून ते इतर सगळ्यांनीच साथ सोडली आणि त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. पण याचं त्यांना अजिबात दुख: नाही असं त्याच्या मुलाखतीतून जाणवलं. हे तेच रमेश भाटिया आहेत ज्यांनी अमिताभ आणि जया बच्चन यांची पहिली भेट घालून दिली.

आजही बॉलिवूडच्या गोष्टी काढल्या तर ते त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. 'गुमनाम' या राजा नवाथे यांच्या सिनेमातून आपल्या अभिनयाची वेगळी झलक भाटिया यांनी त्यांच्या चाहत्यांवर उमटवली होती. 1972मध्ये निर्माता म्हणून पहिल्यांदा त्यांनी 'बंसी बिरजू' सिनेमाची निर्मिती केली. आणि याच सिनेमात अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बहादुरी हे पहिल्यांदा मुख्य भूमिकेत होते.

सुरुवातीच्या काळात अमिताभ यांना कामाची खूप गरज होती. तेव्हा भाटिया यांनी त्यांना कामं मिळवून दिली. 1978मध्ये त्यांनी राजेश खन्नाला कास्ट केलं होतं. धर्मेंद्र, मनोज कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, अमोल पालेकर आणि त्या काळातल्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी भाटिया यांच्यासोबत कामं केली आहेत. अनेक कलाकारांना मोठं करणारे रमेश भाटियांचं आयुष्य सध्या वृद्धाश्रमात हरवलं आहे असंच म्हणावं लागेल. रमेश भाटिया हे त्यांच्या मुलांविषयी फार काही सांगत नाहीत. पण त्यांचं कुटुंब सध्या मुंबईत अय्याशीत जगत आहे. आणि ते त्यांच्या वृद्धाश्रमातल्या त्यांच्या नव्या कुटुंबासोबत आयुष्य घालवत आहेत.

First published: January 13, 2018, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading