Home /News /entertainment /

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक कालवश

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक कालवश

ज्येष्ठ फिल्ममेकर जॉनी बक्षी यांचे मुंबईत निधन झाले आहे. निर्माता-दिग्दर्शन जॉनी बक्षी यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

    मुंबई, 05 सप्टेंबर : ज्येष्ठ फिल्ममेकर जॉनी बक्षी (Johnny Bakshi) यांचे मुंबईत निधन झाले आहे. निर्माता-दिग्दर्शन जॉनी बक्षी यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका न्यूज चॅनेलला प्रतिक्रिया देत निर्मात अमित खन्ना (Amit Khanna) यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, 'श्वसनास त्रास होत असल्यामुळे जॉनी यांनी रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया झाल्याचे आढळून आले आणि कोव्हिड-19 साठी त्यांची चाचणी करण्यात आली. मात्र त्याचा अहवाल येणापूर्वीच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.' दरम्यान इंडस्ट्रीमधील अनेकांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. फिल्ममेकर कुणाल कोहली (Kunal Koli) यांनी देखील जॉनी यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'जॉनी बक्षी सरांच्या मृत्यूची बातमी ऐकून फार वाईट वाटले. #pluschannel मधील माझ्या दिवसांमध्ये मी त्यांना महेश भट्ट आणि अमित खन्ना यांच्या समवेत भेटलो होतो. ते खूप गोड आणि मदत करणारे होते. नेहमी हसणारे. फिल्म इंडस्ट्रीच्या जुन्या गार्ड असणाऱ्यांचा ते एक भाग होते. RIP Sir'. जॉनी बक्षी यांनी अनेक चित्रपटांचे निर्माते म्हणून काम पाहिले आहे. त्यामध्ये विश्वासघात, रावण, मंझिले और भी हैं, मेरा दोस्त मेरा दुश्मन, भैरवी इ. यांसारखे त्यांचे सिनेमे विशेष गाजले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या