मुंबई, 06डिसेंबर : मराठी रंगभूमीवरील नटस्रमाट म्हणून ज्यांची ओळख होती असे ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'लेकुरे उदंड झाली', 'अखेरचा सवाल', 'दुर्गा', 'स्पर्धा', 'मत्सगंधा' सारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केली आहे. मोहनदास यांनी अनेक दशके मराठी रंगभूमीची सेवा केली. मराठी नाटकांमध्ये मोहनदास सुखटणकर यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांच्या अंत्यविधीसाठी दाखल झाले असून मोहनदास यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
मोहनदास सुखटणकर यांनी मराठी रंगभूमीवर अनेक कलाकार घडवले. नाटक, सिनेमा तसेच मालिका विश्वातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, वाट पाहते पुनवेची, जन्मदाता, निवडुंग सारख्या अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. इतकंच नाही तर दूरदर्शनवरील दामिनी, बंदिनी, महाश्वेता सारख्या मालिका देखील त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे आनंदी गोपाळ, सिंहासन, नई दुनिया सारख्या हिंदी मालिकेत त्यांची काम केलं. पण त्यांच्या याप्रवासात ते टेलिव्हिजन विश्वात फार काळ टिकले नाहीत. शेवटपर्यंत नाटकातच त्यांचा जीव अडकला होता.
हेही वाचा- Sayaji Shinde : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंवर चित्रपट निर्मात्याचे गंभीर आरोप
ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या जाण्यानं रंगभूमी पोरकी झाली आहे. मोहनदास यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वर्ष नाट्यसेवा केली.दी गोवा हिंदू असोसिएशनचं मोहनदास यांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. मोहनदास सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी धझाला. त्यांचे वडिल म्हणजेच श्रीपाट सुखटणकर हे गोव्यातील प्रसिद्ध डॉक्टर होते. तसंच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा हातभार होता. त्यामुळे मोहनदास यांचं बालपण आणि प्राथमिक ते दहावीपर्यंतचं शिक्षण गोव्यातील माशेल आणि म्हापसा येथे झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.